घरमहाराष्ट्रLok Sabha Election : निवडणुकीत महिलाशक्ती निर्णायक; 1 हजार पुरुषांमागे एवढा आकडा...

Lok Sabha Election : निवडणुकीत महिलाशक्ती निर्णायक; 1 हजार पुरुषांमागे एवढा आकडा वाढला

Subscribe

राज्यात लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्त्वाचा वाटा असेल. कारण 2004, 2009, 2014 आणि 2019 च्या तुलनेपेक्षा 2024 मध्ये महिला मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

मुंबई : राज्यात यंदा पाच टप्प्यात होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानात महिला शक्ती निर्णायक ठरणार आहे. मागील वर्षात राज्यात मतदारांची संख्या लक्षणीय वाढली असून त्यात महिला मतदारांची संख्या लक्षणीय म्हणजे 4 कोटी 44 लाख 16 हजार 814 इतकी आहे. मागील चार निवडणुकांच्या तुलनेत यावर्षी 1 हजार पुरुषांमागे 923 महिला मतदार अशी लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्त्वाचा वाटा असेल. कारण 2004, 2009, 2014 आणि 2019 च्या तुलनेपेक्षा 2024 मध्ये महिला मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. (Lok Sabha Election 2024 Women’s power decisive in elections 923 number increased after 1 thousand men)

राज्यात 2004 मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण 3 कोटी 42 लाख 63 हजार 317 मतदारांची नोंदणी झाली होती. 2009 आणि 2014 या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार 1 हजार पुरुषांमागे 925 महिला असे प्रमाण होते. सन 2014 मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण 1 हजार पुरुषांमागे 889 महिला इतके होते. सन 2019 मध्ये 1 हजार पुरुषांमागे 911 महिला असे प्रमाण होते. 2024 मध्ये 1 हजार पुरुषांमागे 923 महिला अशी लक्षणीय सुधारणा आता झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : संजय राऊत सांगलीत असतानाच काँग्रेस नेता म्हणतो, उमेदवारीबाबत चांगली बातमी येईल 

राज्यात 5 हजार तृतीयपंथी मतदार

दरम्यान, 2019 मध्ये 8 कोटी 86 लाख 76 हजार 946 एकूण मतदार असल्याची नोंद झाली होती. यामध्ये 4 कोटी 64 लाख 25 हजार 348 पुरुष मतदार होते. तर 4 कोटी 22 लाख 79 हजार 192 महिला मतदार आणि 2 हजार 406 तृतीयपंथी मतदार होते. आता 5 एप्रिल 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण 9 कोटी 26 लाख 37 हजार 230 मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 4 कोटी 86 लाख 4 हजार 798 पुरुष, 4 कोटी 44 लाख 16 हजार 814 महिला मतदार आणि 5 हजार 618 तृतीयपंथी मतदार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Rohit Pawar : हातात खेकडा पकडणं रोहित पवारांना पडलं महागात; PETA कडून कारवाईची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -