घरक्राइमRaigad Crime News : हातभट्ट्यांवर रायगड पोलिसांची वक्रदृष्टी

Raigad Crime News : हातभट्ट्यांवर रायगड पोलिसांची वक्रदृष्टी

Subscribe

रायगड पोलिसांनी रोहा, रसायनीतील ३ हातभट्टया उद्ध्वस्त करत पावणेदोन लाखाचे साहित्य जप्त केले आहे. या कारवाईचे स्थानिकांने स्वागत केले आहे.

रोहे / रसायनी : निवडणुकीमुळे पोलिसांचे काम वाढले असले तरी त्यांचे कर्तव्य ते पार पाडत आहेत. रायगड पोलिसांच्या रोहे आणि रसायनी पोलिसांनी हातभट्टी दारूविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. या दोन्ही कारवायांत गावठी दारू बनवणाऱ्या तीन हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या असून तिन्ही ठिकाणांहून पावणेदोन लाखांचे दारू बनवण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

रोह्याचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांचे नेतृत्वाखाली शनिवारी (६ एप्रिल) पहाटे नीवि आदिवासी वाडीच्या जंगलभागात २ गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. यावेळी ५५ हजार रुपयांचे दारू बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे स्थानिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad ZP News : बिले मंजुरीसाठी 12 एप्रिलपर्यंत मुदत

सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी बेकायदा धंद्यांवर कारवाई करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर रोहे शहराजवळील नीवि गावच्या जंगलभागात नदीच्या किनारी असलेल्या दोन गावठी हातभट्ट्यांवर रोहे पोलिसांनी कारवाई केली. यात दारू बनवण्यासाठी नवसागर आणि गुळ मिश्रित १२०० रुपये किमतीचे रसायन तसेच ६ प्लास्टिक आणि लोखंडी ड्रम असा एकूण ५५ हाजारांचा ऐवज जप्त केला.
आता तांबडी, चणेरे या भागात असणाऱ्या हातभट्टयांवरही पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक करत आहेत. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक ऐदाळे, हेड कॉन्स्टेबल धायगुडे, हेड कॉन्स्टेबल पेडवी, सावरटकर, कॉन्स्टेबल गुट्टे, तडवी आदी सहभागी झाले होते.

- Advertisement -

इकडे रसायनी पाताळगंगा परिसरातील हातभट्ट्यांवरही पोलिसांची वक्र नजर पडली आहे. वडगाव डोंगराळ भागात रसायनी पोलिसांनी हातभट्टीवर छापा टाकून सुमारे सव्वा लाखाचे साहित्य हस्तगत केले आहे. वडगाव डोंगराळ भागात सावळाराम दशरथ पवार (वय 37) याने गावठी दारू तयार दारु करण्याकरिता 2400 लिटर गुळ मिश्रीत रसायन असा एकूण सव्वा लाखाचे साहित्य जमवले होते. रसायनी पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने कारवाई केली. पण याची चाहूल सावळाराम पवारला लागल्याने तो पसार झाला.

हेही वाचा… Raigad News : महाडमधील प्रशासकीय इमारतीची नुसतीच चर्चा! सरकारला कधी जाग येणार?

रसायनी पोलिसांनी तेथून एक लाख रुपये किमतीचे निळ्या रंगाचे 10 प्लास्टिकचे ड्रम, दोन पत्र्याच्या मोठ्या लोखंडी टाक्या तसेच एक इंच व्यासाचे दोन प्लास्टीकचे पाईप याच्यासह गुळ मिश्रीत रसायन जप्त केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंदे मॅडम, सहाय्यक फौजदार कोलेकर, पोलीस हवालदार मंगेश लांगी, कॉन्स्टेबल डफल यांनी कारवाई केली. छाप्यादरम्यान जप्त केलेल्या रसायनापैकी एक लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या बाटलीत नमुना घेत उर्वरित रसायन आणि हातभट्टीचे साहित्य जागीच नष्ट करण्यात आले. याप्रकरणी रसायनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -