घरमहाराष्ट्रLoksabha : रावसाहेब दावनवेंचा 'चिठ्ठी बॉम्ब'; म्हणतात, भाजपाच्या उमेदवारांची यादी माझ्या खिशात

Loksabha : रावसाहेब दावनवेंचा ‘चिठ्ठी बॉम्ब’; म्हणतात, भाजपाच्या उमेदवारांची यादी माझ्या खिशात

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा अद्यापही जाहीर झालेल्या नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच आता महाराष्ट्रात महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्यापही निश्चित झालेला नाही. मात्र भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवारांचा समावेश नसल्याने विरोधकांनी भाजपावर टीकास्त्र डागले आहे. अशातच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजपाच्या उमेदवारांची यादी माझ्या खिशात म्हणत ‘चिट्ठी बॉम्ब’ टाकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Loksabha Raosaheb Davanves Letter Bomb list of BJP candidates in my pocket)

हेही वाचा – Prakash Ambedkar : ईव्हीएम हॅक करत आंबेडकर म्हणाले, भाजपा 400 पार अशक्य!

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या यादीत कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, भाजपाच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी माझ्या खिशात आहे. धुळे, जळगाव, रावेर, पाचोरा, अकोला, भंडारा, गडचिरोली, नांदेड, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी या मतसंघाचा दानवेंनी उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे थोड्याच वेळात याबाबत सविस्तर बोलतो, असं म्हणत संदिग्धता कायम ठेवली आहे. मात्र रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.

हेही वाचा – Shivsena MLA Disqualification: नार्वेकरांच्या निकालावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; मूळ रेकॉर्ड्स मागवले

- Advertisement -

बीडच्या जागेबाबत दानवे काय म्हणाले?

दरम्यान, बीड लोकसभेत भाजपाचे वर्चस्व आहे. त्यामुळे आगामी लोकसभेत ही जागा भाजपालाच मिळणार असल्याची चर्चा आहे. अशातच बीडच्या दौऱ्यावर असलेल्या रावसाहेब दानवे यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, खासदार प्रीतम मुंडे, डॉ. भागवत कराड आणि माझी उमेदवारी याठिकाणी नक्की नाही. लोकसभा निवडणुकीत कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाला नाही, हे आमच्या पक्षातील पार्लमेंटरी बोर्ड ठरवत असतो. ते जो निर्णय घेतील तो अंतिम असतो. पण आम्ही तिघेही उमेदवार आहोत, असेही त्यांच्याकडून शेवटी सांगण्यात आले. त्यामुळे बीड लोकसभेबाबतही आता सस्पेन्स निर्माण  झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -