घरमनोरंजनत्यांच्या जिमला दोषी मानणं... राजू श्रीवास्तव यांच्या मुलीने मृत्यूवर दिली प्रतिक्रिया

त्यांच्या जिमला दोषी मानणं… राजू श्रीवास्तव यांच्या मुलीने मृत्यूवर दिली प्रतिक्रिया

Subscribe

देशातील लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे 2022 मध्ये निधन झाले. त्यांच्या निधनाचा दुःखातून त्यांच्या चाहत्यांसह त्यांचे कुटुंबीय देखील हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, अशातच राजू श्रीवास्तव यांच्या मुलीने एका मुलाखतीत राजूंबाबत अनेक गोष्टींचा उलघडा केला. तसेच ती राजू यांच्या व्यायामाबाबत देखील व्यक्त झाली. खरंतर, राजूंना जिममध्ये वर्कआऊट करतानाच हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे तिने राजूंच्या जिमबाबत आवर्जून काही गोष्टी सांगितल्या.

राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतराला मुलाखतीत राजू यांच्या जिमबाबत देखील प्रश्न विचारण्यात आले. राजू जास्त व्यायाम करायचे का? असा प्रश्न अंतराला विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली की, हो, माझे वडील फिडनेसबाबत खूप जागरुक होते. ते दररोज जिमला जायचे. ते बाहेरगावी गेले तरीही ते त्या ठिकाणी जिम पाहायचे आणि तिथे वर्कआउट करायचे. त्यांच्याशिवाय कुटुंबात आम्हा कोणालाच वर्कआउट करण्यात फार रस नव्हता त्यामुळे आमच्या कुटुंबातील सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत होते. त्यांच्यासोबत जे काही झालं तो फक्त अपघात होता. मात्र, योगायोग असा की, ते जिममध्ये वर्कआउट करतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. या सर्व प्रकारात फक्त त्यांच्या जिमला दोष देणं चुकिचं आहे.

- Advertisement -

Raju Srivastav Death: Comedian Raju Srivastav, And Wife Shikha Srivastava- Family In Photos

दरम्यान, 10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत असताना. त्यांच्या छातीत दुखू लागले आणि ते खाली कोसळले. यानंतर राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात नेले होते. दिल्लीच्या एम्समध्ये उपचारा अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान 21 सप्टेंबर 2022 वयाच्या 59 वर्षी राजू यांचे निधन झाले.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘आलंय माझ्या राशीला’ चित्रपटाचा धमाकेदार टिझर प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -