घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र भूषण कवी मधुकर जोशी यांचे निधन

महाराष्ट्र भूषण कवी मधुकर जोशी यांचे निधन

Subscribe

राज्य सरकारकडून उपेक्षा कायमच

‘अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती’ हे अजरामर गीत लिहिणारे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त कवी मधुकर जोशी यांचे मंगळवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास खासगी रुग्णालयात किडनी विकाराने निधन झाले. निधनासमयी ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात ३ मुले, २ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मंगळवारी दुपारी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील शिव मंदिर मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. साहित्यावर नितांत प्रेम असणार्‍या ज्येष्ठ कवीला उपेक्षित जीवन जगावे लागले. पण तरीही त्यांनी स्वाभिमान सोडला नाही. मात्र इतक्या मोठ्या कवीला राज्य सरकारकडूनही उपेक्षाच वाट्याला आली.

‘अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती’, ‘झिम झिम झरती श्रावणधारा, गोल असे ही दुनिया आणिक गोल’ ‘असे रूपया…सूर्य फिरे हा पृथ्वीभवती फिरते रूपया भवती दुनिया’ यासारखी एकापेक्षा एक हजारो गीते ज्यांच्या सिध्दहस्त लेखणीत उतरली. मधुकर जोशी यांनी पाच हजारपेक्षा अधिक भावस्पर्शी गीते लिहिली आहेत. त्यांची अनेक गाणी गाजली असून अजरामर झालीत.

- Advertisement -

राज्य सरकारने त्याची दखल घेऊन महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. डोंबिवली पूर्वेतील आयरे परिसरातील हेरंब या इमारतीत ते ४० ते ४५ वर्षे राहत होते. काही वर्षांपूर्वी इमारत मालकाने इमारत धोकादायक म्हणून रिकामी करण्याची नोटीस दिली होती. पण बेताची आर्थिक स्थिती असल्याने त्यांना दुसरी जागा घेणे परवडणारे नव्हते. मी जागेसाठी सरकारकडे भीक मागणार नाही, अशी त्याची परखड भूमिका होती. त्यामुळे शेवटपर्यंत त्या जागेतच ते अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगले.

डोंबिवलीत ९० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन संपन्न झाले. त्यापूर्वी संमेलन आयोजकांनी घरी जाऊन त्याचा सन्मान केला होता व नवीन जागेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पण दिले होते. पण संमेलन संपले आणि आयोजकांना विसर पडला; पण याबद्दल त्यांनी कधीही खंत बाळगली नाही. साहित्य क्षेत्रात कवींना अजिबात किंमत नाही. मात्र लेखकांना खूप मान सन्मान आहे. पण माझी काही तक्रार नाही, मी कुणाकडे हात पसरणार नाही, त्यांनी त्यांची ही भूमिका शेवटपर्यंत निभावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -