Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Maharashtra CET Exam 2021: महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स परीक्षा 'या' महिन्यात होण्याची शक्यता,...

Maharashtra CET Exam 2021: महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता, जाणून घ्या संपूर्ण माहिती

महाराष्ट्र CET२०२१ परीक्षा ऑनलाइन माध्यमातून घेण्यात येणार

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स परीक्षा २०२१ची (Maharashtra CET Exam 2021)  तारिख लवकरच जाहीर केली जाणार आहे. महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या निवेदनात CETच्या परीक्षा जुलै २०२१च्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट २०२१च्या पहिल्या आठवड्यात घेतली जाऊ शकते,असे म्हटले आहे.  (Maharashtra CET Exam 2021: Maharashtra Common Entrance Exam is likely to be held on august month)  इंजिनिअरींग,फार्मसी आणि आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. त्याचप्रमाणे विविध अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी सर्वसाधारण CET परीक्षा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. विविध विद्यापीठांचे कुलगुरु, महाराष्ट्र CET सेलचे अधिकारी आणि उच्च शिक्षण विभाग या समितीचा भाग असतील. महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र CET२०२१ परीक्षा ऑनलाइन माध्यमातून घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षांची फि भरली असल्याने त्यांच्याकडून CETपरीक्षांसाठी कोणत्याही प्रकारची फि घेतली जाणार नाही. मात्र महाराष्ट्र CET २०२१ च्या परीक्षांची अधिकृत घोषणा राज्याच्या शिक्षण विभागाकडून अद्याप करण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांना पुढील सूचना मिळे पर्यंत वाट पहावी लागणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र CET म्हणजेच कॉमन एन्ट्रन्स टेस्ट ही तांत्रिक शिक्षण संचनालय,महाराष्ट्र शासनद्वारा आयोजित करण्यात आलेली वार्षिक व्यावसायिक प्रवेश परीक्षा आहे. इंजिनिअरींग, कायदा,व्यवस्थापन,फॉर्मसी, ऑर्किटेक्चर आणि हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी CET परीक्षेत मिळालेले गुण उपयोगी पडतात.


हेही वाचा – EPFO च्या महत्त्वाच्या नियमांत मोठे बदल, कर्मचाऱ्यांनी लवकर अपडेट करा अकाउंट

- Advertisement -

 

- Advertisement -