घरताज्या घडामोडीMaharashtra Corona Update: राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ; ११३ ओमिक्रॉनबाधितांची नोंद

Maharashtra Corona Update: राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ; ११३ ओमिक्रॉनबाधितांची नोंद

Subscribe

राज्यातील काल, मंगळवारच्या नव्या कोरोनाबाधित आणि ओमिक्रॉनबाधित संख्येच्या तुलनेत आज वाढ झाली आहे. काल राज्यात १४ हजार ३७२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर एकही ओमिक्रॉनबाधित आढळला नव्हता. मात्र आज दिवसभरात राज्यात १८ हजार ६७ नवे कोरोनाबाधित आढळले असून ११३ ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. तर ७९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७७ लाख ५३ हजार ५४८वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत १ लाख ४२ हजार ७८४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १ लाख ७३ हजार २२१ सक्रीय रुग्ण आहेत.

राज्यात आज ३६ हजार २८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ७४ लाख ३३ हजार ६३३ रुग्ण बरे कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८७ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ४९ लाख ५१ हजार ७५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७७ लाख ५३ हजार ५४८ (१०.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९ लाख ७३ हजार ४१७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २ हजार ६१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत ११३ ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात सर्वाधिक ओमिक्रॉनबाधित रुग्ण नागपूरमध्ये आडळले आहेत. नागपूरमध्ये ४२, मुंबई आणि मनपामध्ये प्रत्येकी १८, नवी मुंबईत १३, पुणे मनपात ६, अमरावतीमध्ये ४, सातारात ३, उस्मानाबाद आणि सिंधुदुर्गमध्ये प्रत्येकी २, औरंगाबाद, नाशिक, पिंपरी चिंचवड मनपा, रायगड आणि उल्हासनगर मनपात प्रत्येकी १ ओमिक्रॉनबाधिताची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात ३ हजार ३३४ ओमिक्रॉनबाधित आढळले असून यापैकी १ हजार ७०१ ओमिक्रॉन रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.


हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईत गेल्या २४ तासांत १,१२८ नव्या रुग्णांची वाढ, १० जणांचा मृत्यू

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -