घरमहाराष्ट्रजातीय तेढ पसरवणाऱ्या २२ सोशल मीडिया अकाऊंट्सवर महाराष्ट्र सायबर सेल कारवाई करणार

जातीय तेढ पसरवणाऱ्या २२ सोशल मीडिया अकाऊंट्सवर महाराष्ट्र सायबर सेल कारवाई करणार

Subscribe

देशातील जातीय संघर्षाच्या अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सायबर सेलने जातीय तेढ पसरवणाऱ्या विविध सोशल मीडियावरील २२ खाती ब्लॉक करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या २२ खात्यांपैकी २० ट्विटरवर आहेत, तर इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर प्रत्येकी एक आहे.

ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत, महाराष्ट्र सायबर सेलचे पोलीस अधीक्षक (SP) संजय शिंत्रे म्हणाले की, सध्याच्या (देशातील) वातावरणाचे निरीक्षण करताना, विभागांतर्गत ४८ पोलीस स्टेशन्स आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर पोस्ट करणाऱ्या खात्यांवर कारवाई करत आहे.

- Advertisement -

“महाराष्ट्र सायबरने २२ खाती ब्लॉक करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. अनेकांना ब्लॉकही करण्यात आले आहे. सध्याच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर, आम्ही जातीय तेढ पसरवणारी खाती शोधत आहोत,” असं शिंत्रे यांनी सांगितले.

शिंत्रे यांनी माहिती दिली की विविध सोशल मीडियावरील अनेक खाती बनावट संस्था आणि व्यक्तींची आहेत जी जातीय तेढ पसरवण्यासाठी मॉर्फ केलेले फोटो आणि बनावट तंत्रज्ञान वापरत आहेत.

- Advertisement -

आम्ही अशा खात्यांद्वारे जातीय तेढ निर्माण होण्याच्या शक्यतेबद्दल मध्यस्थांना नोटीस पाठवण्यास सुरुवात करतो. या मध्यस्थांमध्ये Facebook, Instagram, Twitter आणि इतरांचा समावेश आहे. ते अशा प्रकारचा मजकूर काढून टाकून त्वरित कारवाई करुन नंतर ते हटवत आहे.

गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र सायबर सेलने मान्यवरांची बदनामी करणाऱ्या सुमारे १२,००० आक्षेपार्ह पोस्ट शोधल्या आहेत, त्यापैकी ६,००० पोस्ट हटवल्या आहेत.

“महाराष्ट्र सायबर दररोज सक्रिय असले तरी, गेल्या एका महिन्यात राजकीय घडामोडी लक्षात घेता सायबर सेल अतिशय सक्रिय आहे,” असेही ते म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -