Petrol-Diesel Rate Today: इंधन दरवाढीला ब्रेक, सलग १५ व्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर; जाणून घ्या

देशातील पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. आज देखील कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले असून त्यामध्ये स्थिरता दिसून आली आहे. सलग १५ व्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाचे दर वाढू लागले आहेत. मात्र, देशात पेट्रोल,डिझेलचे दर स्थिर आहेत.

गेल्या वर्षातील २२ मार्च ते ६ एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये मोठी भाववाढ पहायला मिळाली होती. या काळात इंधनाचे दर प्रति लिटर दहा रुपयांपेक्षा अधिक वाढले होते. मात्र त्यानंतर दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

काय आहेत नवीन इंधनाचे दर?

पेट्रोलियम कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार, आज दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०५.४१ रुपये लिटर आहे तर डिझेलचा दर प्रति लिटर ९६.६७ रुपये लिटर आहे. तसेच मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १२०.५१ रुपये असून, डिझेल प्रति लिटर १०४.७७ रुपये लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल ११५.१२ रुपये आहे, तर एक लिटर डिझेलसाठी ९९.८३ रुपये आहे.

सध्या पेट्रोल, डिझेल आणि इतर सर्वच इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. तसेच केंद्र सरकार पुन्हा एकदा एक्साईज ड्यूटी कमी करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याच्या प्रमुख शहरातील दर हे स्थिर असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाहीये. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १२०.१५ तर डिझेलचा दर १०४.४० रुपये लिटर आहे. तसेच पुण्यात पेट्रोलचा दर १२०.५१ रुपये लिटर असून, डिझेलचा दर १०४.७७ रुपये लिटर आहे.


हेही वाचा : राज्यात कुठेही लोडशेडिंग नाही