अधिवेशनाचा तिसरा दिवस; ‘या’ मुद्द्यांवरुन होणार सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आरोग्य व्यवस्था तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आक्रमकता दाखवली होती.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आरोग्य व्यवस्था तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आक्रमकता दाखवली होती. शिवाय, पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे ओल दुष्काळ जाहीर करण्याती मागणी धरून ठेवली होती. त्यामुळे आज विरोधकांना सत्ताधाऱ्यांकडून चोख प्रत्यत्तर देण्याची शक्यता आहे. (maharashtra monsoon assembly session maharashtra legislature third day cm eknath shinde devendra fadnavis ajit pawar)

पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, रस्त्यांची दुरावस्था, राज्यातील कायदा सुव्यवस्था यासह अन्य मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरुवात झाले आहे. 17 आणि 18 ऑगस्ट रोजी दोन दिवस कामकाज चालल्यानंतर सलग 3 दिवसांच्या सुट्ट्या आल्या. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशी अधिवेशनात हंगामा होण्याची शक्यता आहे.

अधिवेशनाच्या मागील दोन दिवसांत काय झाले थोडक्यात

पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला 17 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार, द्रोपदी मुर्मू यांची देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्द्ल अभिनंदन केले. तसेच जगदीप धनखड यांचंही उपराष्ट्रपती निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींचे अभिनंदन केले.

  • पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 25 हजार 826 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या.
  • राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.
  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये मदत देणार असल्याची घोषणा केली होती.

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस

  • हरिहरेश्वर येथे सापडलेल्या एके 47 प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलीस अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करण्यात आली. बोटीची माहिती घेऊन काही वेळात देवेंद्र फडणवीस सभागृहात निवेदन केले
  • विरोधकांकडून 289 अंतर्गत सर्व कामकाज बाजूला ठेऊन भंडारा जिल्ह्यातील बलात्कार प्रकरणावर चर्चेची मागणी केली होती.
  • आरोग्याच्या सबंधित विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले.
  • पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या संबंधित प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्यमंत्री सभागृहाला देऊ शकले नाहीत. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले.
  • मुंबई गोवा महामार्गा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आक्रमकता पाहायला मिळाली.
  • बीड जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या संदर्भात पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित करण्याची गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा
  • सार्वजनिक सणांवरील बंदी हटवली

25 ऑगस्टपर्यंत अधिवेशन

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ते 25 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे.


हेही वाचा – महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : सुप्रीम कोर्टातील सुनावणी उद्याऐवजी परवा होण्याची शक्यता