घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : सुप्रीम कोर्टातील सुनावणी उद्याऐवजी परवा होण्याची शक्यता

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : सुप्रीम कोर्टातील सुनावणी उद्याऐवजी परवा होण्याची शक्यता

Subscribe

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी 22 ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी परवा म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी 22 ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी परवा म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुपारी सुनावणी होणाऱ्या यादीत समाविष्ट असणारी सुनावणी बदलण्यात आली आहे. तांत्रिक अडचणीमुळे सुनावणी पुढे जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. एकनाथ शिंदेगटाला कमकुवत करण्यासाठी शिवसेनेकडून 16 आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आलीय. त्याबाबत 16 पिटिशनही सादर करण्यात आलेत. 16 आमदारांच्या निलंबन नोटिसीविरोधात एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांचे बंड, आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेले सरकार याबाबत सुप्रीम कोर्टात सुरु असलेली सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. उद्या दिनांक २२ ऑगस्ट रोजी या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार होती. मात्र आता ती सुनावणी उद्या होईल का, याची शक्यता कमी आहे. तांत्रिक कारणामुळे ही सुनावणी आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

हे आहे सुनावणीत अपेक्षित?

- Advertisement -
  • सरन्यायाधीश रमण्णा हे 26 ऑगस्टला निवृत्त होतायत, निवृत्तीआधी ते हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवतायत का हे उद्या कळेल.
  • प्रकरण घटनापीठाकडे गेले तर ते अधिक काळ लांबेल याचीही शक्यता आहे.
  • काही मुद्द्यांवर घटनापीठाकडे हे प्रकरण जाईल, पण काही मुद्द्यांवर कोर्ट आपला निकाल देते का याचीही उत्सुकता असेल.
  • विशेषत: अपात्रतेसंदर्भातल्या कारवाईबाबत आता अजून किती काळ स्थगिती राहते हे पाहणे महत्वाचे असेल.

हेही वाचा – ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचा ‘आप’मध्ये प्रवेश

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -