घरमहाराष्ट्रशरद पवार देशपातळीवर राबवणार ‘महाराष्ट्र पॅटर्न’

शरद पवार देशपातळीवर राबवणार ‘महाराष्ट्र पॅटर्न’

Subscribe

देशपातळीवर जनतेला पर्याय हवा आहे. तसा पर्याय निर्माण होऊ शकतो हे महाराष्ट्राने दाखवून दिले आहे. त्यामुळेच देशाची महाराष्ट्राकडे नजर लागली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मला पत्र पाठवून विरोधी पक्षाची बैठक बोलावण्याची विनंती केली असून इतर नेत्यांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेऊ, असं सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधकांची मोट बांधणार असल्याचे संकेत दिले. अहमदनगर दौर्‍यावर आले असता शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे संकेत दिले. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची प्रतिक्रिया वाचण्यात आली.

महाराष्ट्र आणि पवारांनी जो निर्णय घेतला त्यातून प्रेरणा मिळाल्याचे सोरेन म्हटले होते. आम्ही जो निर्णय घेतला असा निर्णय इतर राज्यांनीही घ्यायला हवा. लोक पर्याय बघत आहेत. त्यांना पर्याय हवा आहे. कुठलाही एखादा पक्ष पर्याय देईल, अशी अवस्था आज नाही. त्यामुळे किमान समान कार्यक्रमावर पर्याय देता येऊ शकतो. लोक ते मान्यही करतात. किमान समान कार्यक्रमावर आधारित पर्याय लोकांना मान्य होईल, असा विश्वास जाणकार व्यक्त करत आहेत, असे पवार म्हणाले.

- Advertisement -

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मला काल पत्र आले आहे. त्यांनी आम्हाला पुढाकार घेऊन एक बैठक बोलावण्याची विनंती केली आहे. इतरांशी चर्चा करून काय करता येईल ते बघतो. बघू पुढे काय होते ते? असेही पवार यांनी सांगितले. लोक महाराष्ट्राकडे आशेने बघत आहेत, एवढे मात्र निश्चित, असेही पवार म्हणाले.

कोणत्याही पक्षात, कोणतीही नाराजी नाही

यावेळी त्यांनी राज्यातील खातेवाटपावरही भाष्य केलं. कोणत्याही पक्षात कोणतीही नाराजी नाही. आठ दिवसांपूर्वीच खाते वाटप झालं आहे. कुणावर कोणती जबाबदारी द्यायची हे सुद्धा ठरलं आहे. मुख्यमंत्री केव्हाही खातेवाटप जाहीर करतील, असं त्यांनी सांगितलं. तरुणांना आम्ही पुढे आणण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी राज्यमंत्र्यांची संख्या कमी असल्याने त्यांच्याकडे चार-पाच खाती देण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा जास्त भार असेल, असंही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -