घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्याला गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

Maharashtra Politics : संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याला गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

Subscribe

सांगली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे मागील दोन ते तीन दिवसांपासून सतत शिंदे गटाचे गुंडांसोबत असलेले कनेक्शन उघडकीस आणत आहेत. कालच (ता. 036 फेब्रुवारी) त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुंड निलेश घायवळ याचा फोटो X या सोशल मीडिया साईटवर पोस्ट केला. या फोटोवरून महाराष्ट्र हा देशातील सर्वांत मोठा गुंडगिरीचा अड्डा असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. परंतु, राऊतांनी गुंडांवरून केलेल्या आरोपांना आता शिवसेना नेते आणि सरकारमधील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आधी संत वाटणारे एकनाथ शिंदे यांना आता गुंड वाटतात, असा टोला पाटलांनी राऊतांना लगावला आहे. (Maharashtra Politics : Gulabrao Patil reply to Sanjay Raut ‘that’ statement)

हेही वाचा… Sanjay Raut : हातात भगवा घेतलेले हे महात्मा कोण आहेत? संजय राऊतांकडून आणखी एक फोटो ट्वीट

- Advertisement -

मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता, त्यांनी राऊतांनी केलेल्या आरोपांना आणि त्यांनी केलेल्या विधानांना प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरे गटासोबत होते, तेव्हा ते साधुसंत होते आणि आता त्यांना गुंड वाटतात. गेल्या दीड-दोन वर्षांपासून ठाकरे गटाकडून आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे गटातील गद्दारांना गाडण्याची भाषा बोलली जात असल्याचे आम्ही ऐकत आहोत. मात्र, जनताच ठरवेल आता काय ते, असे प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.

तर, यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबतही आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, छगन भुजबळ मंडल आयोगापासून ओबीसींचे काम करतात. त्यांचा मार्ग हा ओबीसींचा आहे. त्यांना जे वाटते ते बोलतात. छगन भुजबळ वेगळा पक्ष काढण्याचा चुकीचा निर्णय घेणार नाहीत. त्यांनी भावना व्यक्त केली आहे. भावना म्हणजे कृती नाही. हे कृतीत आल्यानंतर त्यावर बोलणे उचित होईल, असे गुलाबराव पाटलांनी सांगितले. ओबीसी समाजाचा वेगळा पक्ष काढण्याची घोषणा प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. या अगोदर त्यांनी छगन भुजबळ यांच्याशी सल्लामसलत केली आहे, याचबाबत पाटलांनी आपले मत व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -