घरमहाराष्ट्रखुर्चीचा मोह आवरेना! उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचा स्टिकर काढून सत्तार झाले विराजमान

खुर्चीचा मोह आवरेना! उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचा स्टिकर काढून सत्तार झाले विराजमान

Subscribe

कार्यक्रमात अजित पवार यांच्या नावाची खुर्ची ठेवण्यात आली होती. दरम्यान, मंत्री अब्दुल सत्तार यांनी अजित पवारांच्या नावाचा स्टीकर काढून टाकला आणि ते त्या खुर्चीवर बसले. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

मुंबई: आज मंत्रालयात प्रदूषणमुक्त दीपावली संकल्प अभियान 2023 अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होती. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी हजेरी लावली होती. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्याच्या कारणामुळे या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. कार्यक्रमात अजित पवार यांच्या नावाची खुर्ची ठेवण्यात आली होती. दरम्यान, मंत्री अब्दुल सत्तार यांनी अजित पवारांच्या नावाचा स्टीकर काढून टाकला आणि ते त्या खुर्चीवर बसले. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. (Maharashtra Politics Minister Abdul Sattar removed Ajit Pawar s name sticker and sat on that chair )

प्रदूषणमुक्त दीपावली संकल्प अभियान 2023 अंतर्गत आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वजण उपस्थित राहणार होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते. तसंच, या कार्यक्रमात शालेय विद्यार्थी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शपथ घेणार आहेत.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार हे डेंग्यू झाल्यापासून पहिल्यांदा कार्यक्रमाला हजेरी लावणार होते. मात्र, ते आजच्या कार्यक्रमालाही गैरहजर राहिले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन, अतुल सावे आदी नेतेही उपस्थित होते. परंतु अजित पवार हे अनुपस्थित होते. ते गैरहजर असल्याने त्यांच्या नावाचं स्टिकर असलेली खुर्ची रिकामी होती. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्टिकर काढून टाकत त्या खुर्चीवर बसले.

- Advertisement -

नार्वेकरांनी अजित पवारांना दिली मुख्यमंत्र्यांची खुर्ची

मनोरा आमदार निवासच्या भूमीपुजनाचा कार्यक्रम होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्य़क्रमाला गैरहजर होते. परंतु त्यांच्या नावाची खुर्ची व्यासपीठावर ठेवण्यात आली होती. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अजित पवारांना बोलावून मुख्यमंत्र्यांच्या नावाचं स्टिकर काढून टाकत त्या खुर्चीवर बसण्यास सांगितलं होतं. त्यावेळी देखील यावर चर्चा झाली होती.

याआधी जानेवारीमध्ये पुण्यात एका कार्यक्रमात अजित पवार हे उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले होते. त्यावेळी ते राज्याचे विरोधी पक्षनेते होते. झालं असं होतं की, पुण्याच्या बालेवाडी स्टेडिअममध्ये ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घटानाचा कार्यक्रम होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह विरोधी पक्षनेत्यांनाही बोलावण्यात आलं होतं. परंतु या कार्यक्रमाला हजेरी लावून फडणवीस तातडीने दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघून गेले. यावेळी अजित पवार फडणवीसांच्या खुर्चीवर बसले होते.

एकीकडे नेते नसताना त्यांच्या नावाच्या खुर्च्या ठेवल्या जातात तर दुसरीकडे मात्र खुर्च्यांचे स्टीकर काढून त्यावर मंत्री विराजमान होत आहेत. त्यामुळे सध्या याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

(हेही वाचा: Gram Panchayat Elections : अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेकडून सलामी; सुनील तटकरेंची प्रतिक्रिया )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -