घरमहाराष्ट्रमहा विकास आघाडीच्या सत्ता वाटपात राष्ट्रवादीची 'आघाडी', जास्त मंत्रिपदाची मागणी

महा विकास आघाडीच्या सत्ता वाटपात राष्ट्रवादीची ‘आघाडी’, जास्त मंत्रिपदाची मागणी

Subscribe

महा विकास आघाडीचा सत्ता स्थापनेचा नवा फॉर्म्युला ठरला?

महाराष्ट्रात महा विकास आघाडीची सत्ता स्थापन होऊन आता एक आठवडा झाला. तरिही सत्ता वाटपाचा फॉर्म्युल्यावर अद्याप चर्चा सुरुच आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रवादीने आधी ठरलेल्या फॉर्म्युल्यात बदल करत स्वतःच्या पदरात अधिकचे मंत्रीपद मिळवले आहे. याआधी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार शिवसेनेला मुख्यमंत्रीपद आणि १५ मंत्रिपदे, राष्ट्रवादीला १५ आणि काँग्रेसला विधानसभा अध्यक्षांसहीत १२ मंत्रिपदे मिळणार होती. मात्र आता राष्ट्रवादीला १६ मंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.

इंडिया टुडेने शरद पवारांच्या मुलाखतीचा हवाला दिला आहे. शिवसेनेला राष्ट्रवादीपेक्षा फक्त दोन जागा अधिक आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालेले आहे. तर काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या १० जागा जास्त असून काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद मिळालेले आहे. मग राष्ट्रवादीला वेगळे काय मिळाले? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळत असले तरी उपमुख्यमंत्र्याला वेगळे विशेष अधिकार नाहीत, असेही पवार यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

महा विकास आघाडीमध्ये शिवसेना ५६ आमदार असलेला सर्वात मोठा पक्ष आहे. तर राष्ट्रवादी ५४ जागांवर आहे. तर काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. आता नव्या फॉर्म्युलानुसार शिवसेनेला ११ कॅबिनेट तर ४ राज्यमंत्री असे एकूण १५, राष्ट्रवादीला १२ कॅबिनेट तर ४ राज्यमंत्री असे एकूण १६ आणि काँग्रेसला ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रिपदे अशी एकूण १२ मंत्रिपदे मिळणार असल्याची चर्चा आहे.

मंत्रीमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनानंतरच

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -