घरदेश-विदेशअरबी समुद्रात अडकलेल्या २६४ मच्छिमारांची भारतीय तटरक्षक दलाने केली सूटका

अरबी समुद्रात अडकलेल्या २६४ मच्छिमारांची भारतीय तटरक्षक दलाने केली सूटका

Subscribe

अरबी समुद्रात अडकलेल्या मच्छिमारांच्या ५० बोटींना बाहेर काढण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश आले आहे. या ५० बोटींमध्ये २६४ मच्छिमार होते. अचानक हवानात बदल झाला. वातावरण खराब झाले आणि समुद्र खवळला २६४ मच्छिमार अडकून पडले. याबाबत तामिळनाडूच्या मच्छिमार संघटनांनी भारतीय तटरक्षक दलाला माहिती दिली. तटरक्षक दलाने तातडीने मदतकार्य सुरु करत सर्व मच्छिमारांची सुखरुप सुटका केली. या कामासाठी व्यापारी जहाजांनी मौल्यवान मदत केली.

सात व्यापारी जहाजांनी केली सूटका

अरबी समुद्रात पश्चिम गोव्यापासून २५० नॉटिकल मैल अंतरावर मच्छिमार बोटी अडकल्याची माहिती ३ डिसेंबरला भारतीय तटरक्षक दलाला मिळाली. याद्दलची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाने मदतकार्य सुरु केले. तटरक्षक दलाने तातडीने सात व्यापारी जहाजांशी संपर्क साधला आणि त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली. या जहाजांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर तटरक्ष दलाच्या बोटी समुद्रात निघाल्या. मदत करणाऱ्या सात व्यापारी जहाजांमध्ये नवधेनू पूर्णा या जहाजाने ८६ मच्छिमारांची सूटका केली. तर जपानच्या एम व्ही तोवाडा जहाजाने ३४ मच्छिमारांची सूटका केली.

- Advertisement -

मच्छिमारांची प्रकृती उत्तम

अरबी समुद्रात अडकलेल्या मच्छिमारांना बाहेर काढण्यात मॅरिटाईम रेस्क्यू कॉर्डिनेशन सेंटरने देखील मदत केली. मॅरिटाईम रेस्क्यू कॉर्डिनेशन सेंटरच्या मदतीमुळे आणखी पाच व्यपारी जहाज मदतीसाठी पुढे सरसावले. त्यामुळे सर्व २६४ मच्छिमारांची सूटका झाली. दरम्यान, मच्छिमारांच्या सूटकेनंतर त्यांना खाद्यपदार्थ आणि प्रथमोपचार देण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या सर्व मच्छिमारांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती भारतीय तटरक्षक दलाने दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – समुद्रात एकाच वेळी दोन वादळ, मुंबईसह पुण्यात आज पाऊस?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -