घरमहाराष्ट्र...तर मुंबईची दूध कोंडी निश्चित!!

…तर मुंबईची दूध कोंडी निश्चित!!

Subscribe

आंदोलनामुळे सोमवारी तरी मुंबईची दूध कोंडी झालेली नाही. मात्र आंदोलकांचा आक्रमक पवित्रा कायम राहिल्यास मुंबईची दूध कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे दूध विक्रेता संघटनांनी म्हटले आहे.

दूध दरवाढीच्या मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून रविवारी मध्यरात्रीपासून आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर पंढरपुरात विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालत आंदोलनाची सुरूवात झाली. सोमवारी मुंबईकडे येणारे दुध रोखण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. मात्र सोमवारी मुंबईच्या दूध पुरवठ्यावर कोणतीही परिणाम झालेला नाही. राज्यभरात सुरू असलेले आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने देखील कंबर कसली आहे. मुंबईला रोज ७० लाख लिटर दुधाची गरज असते. मुंबईची दुधाची गरज भागवण्यासाठी राज्याबाहेरून देखील दुध येते. पण अद्याप तरी आंदोलनामुळे दुध पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. मुंबईची दुधाची गरज भागवण्यासाठी अमूल डेअरीचे १२ ते १२.५० लिटर दूध, गोकूळ ७ ते ७.५० लाख लिटर, मदर डेअरी २ लाख लिटर, वारणा २ लाख लिटर, नंदीनी दूध १ लाख लिटर, गोवर्धन २.५० लाख लिटर,गोविंद १ लाख लिटर, प्रभात १ लाख लिटर, कृष्णाई ८० ते ९० हजार लिटर आणि सोनाईचे ५० हजार लिटर दूध मुंबईमध्ये येते. पण, सोमवारी मुंबईच्या दूध पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र आंदोलन असेच सुरू राहिल्यास मुंबईची दूध कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे दूध विक्रेता संघांचे म्हणणे आहे

राज्यभरात टँकर फोडले

दूधाला प्रतिलिटर ५ रूपये वाढीव दर देण्याची मागणी केली जात आहे. त्यावरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. राज्यात विविध ठिकाणी दुधाचे टँकर अडवण्यात आले. तर पुण्यात दुधाचे ५ टँकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले. कोल्हापूर, सोलापूर, सांगलीसह राज्यातील इतर भागात देखील दुधाचे टँकर अडवले गेले. दरम्यान मुंबईला दुधाचा एक थेंबही कमी पडू देणार नाही म्हणत आंदोलनकर्त्यांवर कडक कारवाईचा इशारा दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी दिला आहे.

- Advertisement -

milk strike

milk strike
शेतकरी आक्रमक, दूध रस्त्यावर ओतले

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -