घरताज्या घडामोडी७ नोव्हेंबर रोजी मराठा मशाल मोर्चा मातोश्रीवर धडकणार

७ नोव्हेंबर रोजी मराठा मशाल मोर्चा मातोश्रीवर धडकणार

Subscribe

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजात आक्रोश पसरलेला आहे. त्यातच २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुप्रीम कोर्टातील मराठा आरक्षणाच्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारच्या वकीलांना सुनावणीला हजर राहण्यास उशीर झाला होता. त्यामुळे संतापलेल्या मराठा समाजाने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. आता थेट मराठा क्रांती मोर्चाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीवर मशाल मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. या मोर्चात मराठा आमदारांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे.

मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत ७ नोव्हेंबर रोजी मातोश्रीवर धडक देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासोबतच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करण्यात यावी, असा ठराव देखील या बैठकीत मंजूर करण्यात आला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -