घरक्राइमजम्मू-काश्मीर: श्रीनगरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार; युवा मोर्चाच्या महासचिवाचा मृत्यू

जम्मू-काश्मीर: श्रीनगरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार; युवा मोर्चाच्या महासचिवाचा मृत्यू

Subscribe

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हत्यांचं सत्र थांबायचं नाव घेत नाही आहे. गुरुवारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस फिदा हुसेन यांच्यासह ३ नेत्यांना ठार केलं आहे. ओमर रशीद बेग आणि अब्देर रशीद बेग अशी आणखी दोन नेत्यांची नावे आहेत. गुरुवारी रात्री आठ वाजता भाजपच्या तीन नेत्यांवर दहशतवादी हल्ला झाला. हल्ल्याची माहिती मिळताच कुलगाम पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

फिदा हुसेन, ओमर रशीद बेग आणि अब्देर रशीद बेग अशी मृत भाजप नेत्यांची नावं आहेत. भाजपच्या या तीन कार्यकर्त्यांवर गोळीबार केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तिघेही जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

- Advertisement -

भाजप युवा मोर्चाचे महासचिव फिदा हुसेन हे दोन सहकाऱ्यांसोबत घराच्या दिशेने जात होते. वाटेत दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्या वाहनावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. यानंतर दहशतवादी तेथून फरार झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी भाजप नेत्यासह साथीदारांना हॉस्पटलमध्ये नेलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस व सैन्याने घटनास्थळाचा भाग घेरला असून दहशतवाद्यांचा शोध सुरु केला आहे. याआधीही भाजपच्या नेत्यांवर दहशतवादी हल्ले झाले आहेत. अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे घाबरून अनेकांनी राजीनामा दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -