घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र बंदला मुस्लिम संघटनांचाही पाठिंबा!

महाराष्ट्र बंदला मुस्लिम संघटनांचाही पाठिंबा!

Subscribe

९ ऑगस्ट क्रांती दिनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले असून नवी मुंबई, ठाणे वगळता संपूर्ण राज्यभर बंद करण्यात येईल, असे सकल मराठाचे समन्वयक यांच्यावतीने सांगण्यात आले आहे. काही मुस्लिम समाजातील नेत्याचाही मराठा समाजाच्या बंदला पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत ५८ मराठा मोर्चे शांततेत काढूनही राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांची दखल घेतले नाही. त्यामुळे ९ ऑगस्ट क्रांती दिनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले असून नवी मुंबई, ठाणे वगळता संपूर्ण राज्यभर बंद करण्यात येईल, असे सकल मराठाचे समन्वयक अमोल जाधवराव यांनी सांगितले. दादर शिवाजी मंदिरातील राजर्षी शाहू सभागृहात ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, काही मुस्लिम समाजातील नेत्याचाही मराठा समाजाच्या बंदला पाठिंबा असल्याचे ते म्हणाले.

वाचा ः मुंबई, ठाणे, परळी वगळून ९ ऑगस्टला महाराष्ट्र बंद

यापुढे ‘ऑगस्ट मराठा क्रांती दिन’ साजरा व्हावा

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने अनेक वेळा बंदची हाक दिली आहे.  परंतू राज्य सरकारकडून वेळोवेळी फक्त आश्वासनच देण्यात आली. मात्र गुरुवार, ९ ऑगस्ट रोजी होणारे मुंबई बंद आंदोलन तीव्र होणार असून काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा जाधवराव यांनी दिला. दरम्यान, मुंबईसह राज्यातील अनेक भागात उत्स्फूत बंद पाळण्यात येईल, असेही ते म्हणाले. ९ ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून साजरा करण्यात येत असून भविष्यात ९ ऑगस्ट मराठा क्रांती दिन म्हणून साजरा करण्यात येईल, असे केदार सुर्यवंशी म्हणाले.

- Advertisement -

वाचा ः आरक्षणाची मागणी करणाऱ्या रमेश पाटील यांनी आत्महत्या

मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन द्यावे

मराठा समाजात फुट पडली नसून प्रत्येक जण आपल्या स्तरावर आंदोलन करत आहे. गुरुवारी होणारी आंदोलनं हे शांततेत पार पडणार असून कार्यकर्त्यांनाही शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केल्याचे जाधवराव म्हणाले. मुंबईसह राज्यात प्रत्येक जण आपल्या स्तरावर आंदोलन करणार आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, असेही जाधवराव यावेळी म्हणाले. दरम्यान, शाळा, काँलेज, दूध, मेडिकल अशा अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, हेदेखील त्यांनी नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -