घरदेश-विदेश'दलित म्हणून सीताराम केसरींना अध्यक्षपदावरून हटवलं'

‘दलित म्हणून सीताराम केसरींना अध्यक्षपदावरून हटवलं’

Subscribe

सीताराम केसरी हे दलित होते त्यामुळे त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवलं गेलं आणि अध्यक्षपदासाठी सोनिया गांधी यांचा मार्ग मोकळा केला गेला. अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

काँग्रेस आणि भाजपमध्ये सध्या घराणेशाहीवरून जोरदार वाकयुद्ध रंगल्याचं पाहायाला मिळत आहे. सीताराम केसरी हे दलित होते त्यामुळे त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवलं गेलं आणि अध्यक्षपदासाठी सोनिया गांधी यांचा मार्ग मोकळा केला गेला. अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. छत्तीसगडमधील विधानसभेच्या प्रचारादरम्यान बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एका गांधी घराण्यावर जोरदार प्रहार केला आहे. छत्तीसगडमध्ये सध्या दुसऱ्या टप्प्याच्या निवडणूक प्रचाराला जोर चढला असून भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर जोरदार हल्ले आणि प्रतिहल्ले करताना पाहायाला मिळत आहे. ९० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये १८ जागांसाठी मतदान पार पडलं असून दुसऱ्या टप्प्याचं मतदान २० नोव्हेंबर पार पडणार आहे. यापूर्वी देखील काँग्रेसमध्ये घराणेशाही असल्याचा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. सीताराम केसरी हे दलित होते. म्हणून त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची ५ वर्षे देखील पूर्ण करता आली नाहीत. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आणि सोनिया गांधी यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला असा घणाघात नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यापूर्वी दिल्लीतून चालणाऱ्या सरकारचं रिमोट कंट्रोल हे केवळ गांधी घराण्याच्या हाती होतं अशा शब्दात नरेंद्र मोदींनी सोनिया गांधी यांना लक्ष्य केलं.

वाचा – छत्तीसगडमध्ये ११ कोटी ८५ लाखांची दारू, रोकड जप्त

काँग्रेसनं गांधी घराण्याव्यतिरिक्त दुसऱ्या कुणालाही अध्यक्षपदी बसवावं असं आव्हान देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला दिलं. काँग्रेस केवळ एका घराण्याभोवती पिंगा घालत आहे. गांधी घराण्यातील चार पिढ्यांनी आत्तापर्यंत देशावर राज्य केलं. केवळ त्यांच्याच भल्याचा विचार केला गेला. पण, मग लोकांच्या भल्याचा विचार कोण करणार? असा सवाल देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्यामुळे आता त्यांच्याकडून लोकांच्या आशा – आकांक्षा पूर्ण होतील यावर विश्वास तरी कसा ठेवणार? असा सवाल देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. १० वर्षे छत्तीसगडमधील रमण सिंग सरकारला काँग्रेस सरकारनं खूप त्रास दिला. त्यांनी छत्तीसगडकडे कायम दुर्लक्ष केल्याची टीका देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

- Advertisement -

दरम्यान, यापूर्वी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गांधी घराण्याव्यतिरिक्त झालेल्या अध्यक्षांची यादी देत पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे सध्या भाजप आणि काँग्रेसमध्ये घराणेशाहीवरून वाकयुद्ध रंगल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील राफेल करारासह, बेरोजगारीच्या मुद्यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. दिवसेंदिवस भाजप आणि काँग्रेसमधील वाद अधिक रंगताना दिसत आहे.

वाचा – Rafale deal : राहुल गांधींचं मोदींना १५ मिनिटं चर्चेचं आव्हान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -