घरताज्या घडामोडीमराठी भाषा सल्लागार समिती गठीत, जेष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख अध्यक्षपदी

मराठी भाषा सल्लागार समिती गठीत, जेष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख अध्यक्षपदी

Subscribe

भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर समितीचे सदस्य सचिव म्हणून भाषा संचालनालयाचे संचालक काम पाहणार असून समितीत डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ.पंडीत विद्यासागर, सुरेश वांदिले, डॉ. गणेश चंदनशिवे आदींचासमावेश करण्यात आला आहे.

राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी कायमस्वरुपी भाषा सल्लागार समिती स्थापन करण्यात आली असून पुनर्रचित भाषा सल्लागार समितीवर अध्यक्ष आणि सदस्यांची ३ वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

- Advertisement -

समितीत अनंत पां. देशपांडे, डॉ. सुहास पळशीकर, डॉ. केशव सखाराम देशमुख, डॉ. हरिश्चंद्र बोरकर, डॉ. गिरीश दळवी, डॉ. चिन्मय धारूरकर, डॉ. रमेश वरखेडे, डॉ. वंदना महाजन, डॉ. प्रकाश परब, किशोर कदम, प्रा. मिलिंद जोशी, प्रा. वैजनाथ महाजन, डॉ. अनुपमा उजगरे, पृथ्वीराज तौर, पी.विठ्ठल, सुरेश वांदिले, अनिल गोरे, अनुराधा सोहनी, जयश्री देसाई, प्रणव सखदेव, प्रकाश होळकर, डॉ. विवेक घोटाळे, सयाजी शिंदे, जयंत येलुलकर, शमशुद्दीन तांबोळी, डॉ. राजीव यशवंते हे समितीचे सदस्य असणार आहेत.

मराठी भाषा विभाग, पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग, शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्र शिक्षण या खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव/ प्रधान सचिव/सचिव यांच्यसह संचालक, राज्य मराठी विकास संस्था, सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई, सदस्य सचिव संचालक, भाषा संचालनालय, यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -