घरमहाराष्ट्रकिमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार; लवकरच सोनिया-पवार यांची भेट

किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार; लवकरच सोनिया-पवार यांची भेट

Subscribe

आमच ठरतय,शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीच्या बैठकांना सुरुवात, १७ नोव्हेंबरला सोनिया गांधी आणि शरद पवार यांची भेट, एकसुत्री कार्यक्रमाचा मसुदा पाठवणार तिन्ही पक्षश्रेष्ठींकडे, शेतकर्‍यांना केेंद्रस्थानी ठेवून महाआघाडीचा मसुदा तयार, अजित पवार, धनंजय मुंडे राष्ट्रवादीकडून अनुपस्थित, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांची दांडी,

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या समन्वय समितीची बैठक गुरुवारी वांद्रे येथील एमईटी या शिक्षण संस्थेत पार पडली. या बैठकीत किमान समान कार्यक्रमाचा मसुदा निश्चित करण्यात आला असून तो तिन्ही पक्षांच्या पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात येणार आहे. पक्षश्रेष्ठींनी सुचवलेल्या बदलानुसार त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल, अशी माहिती बैठकीनंतर शिवसेना महाआघाडीच्या नेत्यांनी पत्रकारांना दिली. तसेच येत्या १७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटणार असून मसुद्यावर चर्चा करतील, असेही सांगण्यात आले. महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना आघाडीच्या सुरु असलेल्या बैठकांचे सत्र गुरुवारी ही कायम राहिले.

बुधवारी मीडियाला चकवा देवून ट्रायडंट हाटेलमध्ये काँग्रेस,राष्ट्रवादीने बैठक घेतली. या बैठकीत किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यासाठी चर्चेचे गुर्‍हाळ सुरु ठेवण्याचा निर्णय झाला. या बैठकीत शिवसेना आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला असून तो लवकरच तिन्ही पक्षांच्या हायकमांडकडे पाठवून अंतिम घेण्यात येणार असल्याचे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून पत्रकारांना सांगण्यात आले.

- Advertisement -

शिवसेना महाआघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहेत. गुरुवारी देखील या तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीची बैठक झाली. ही बैठक वांद्रे येथील छगन भुजबळ यांच्या एमईटी या शिक्षण संस्थेत पार पडली. त्यात काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, विजय वड्डेटीवार, माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, नवाब मलिक, छगन भुजबळ तर शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे उपस्थित होते.

या बैठकीत तिन्ही पक्षांकडून आपापल्या जाहीरनाम्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. पक्षांच्या जाहीरनाम्यानुसार शिवसेना महाआघाडीचा किमान समान कार्यक्रम निश्चित करण्याच्या हालचाली सुरु होत्या. या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या शिवसेनेशी आघाडीचे संकेत दिल्यानंतरची ही पहिली संयुक्तिक बैठक होती. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. विशेष म्हणजे, छगन भुजबळ यांनी पक्ष सोडल्यानंतर पहिल्यांदाच सेनेच्या नेत्यांबरोबर बैठकीत सामील झाल्याने ही बैठक महत्वपूर्ण मानली जात होती.

- Advertisement -

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे विजय वड्डेटीवार म्हणाले की, तिन्ही पक्षांकडून आज झालेल्या चर्चेनंतर किमान समान कार्यक्रमाच्या अनुषंगाने एकसूत्री मसुद्याला आम्ही अंतिम स्वरुप दिले आहे. आता हा अंतिम मसुदा आम्ही काँग्रेसचे सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना दाखविणार असून त्यांनी सुचविलेल्या बदलानंतर तो अंतिम करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील चर्चा होणार आहे. लवकरात लवकर सत्ता स्थापन व्हावी, ही सर्वांची इच्छा आहे.

मुख्यमंत्री पदाचा दावा नाही
शिवसेना महाआघाडीच्या सुरु असलेल्या चर्चेत काँग्रेसने मुख्यमंत्री पदाची मागणी केली असल्याने नाराजी व्यक्त केली जात असल्याबाबत विजय वड्डेटीवार यांच्याकडे विचारणा केली असता, अशा प्रकारची कोणतीही मागणी आम्ही केली नाही, ही फक्त एक अफवा आहे, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -