घरमहाराष्ट्र३२ हजार जागांची मेगाभरती

३२ हजार जागांची मेगाभरती

Subscribe

कृषिसेवक, बांधकाम विभाग, एसटी, महापालिका आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये भरती होणार आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे ३२ हजार जागांची मेेगाभरती केली जाणार असून त्यासाठी जाहिरात देखील प्रसिध्द झाली आहे. कृषीसेवक, परिवहन महामंडळ (एसटी), सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे, महापालिका आणि जिल्हा परिषद यांमधील सर्व जागांसाठी सोमवार दि.२५ जानेवारीपर्यंत इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

‘या’ संकेतस्थळावर भरा अर्ज

७२ हजार जागांच्या मेगा भरतीच्या निमित्ताने नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या युवकांना दिलासा मिळणार आहे. या मेगाभरतीचा एक भाग म्हणून विविध आस्थापनांमधील ३२ हजार जागांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने जागा भरल्या जाणार असल्याने युवकांना या संधीचा फायदा होणार आहे. www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. या संकेतस्थळावर जाहीरातही प्रसिद्ध करण्यात आल्या असून मेगाभरतीची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. मेगा भरतीची संपूर्ण प्रक्रिया व परीक्षा १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०१९ पर्यंत राबवली जाणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी ४०० रुपये तर मागास प्रवर्गासाठी २०० रुपये शुल्क असणार आहे. तसेच खुल्या प्रवर्गासाठीची वयोमर्यादा १८ ते ३८ व मागास प्रवर्गासाठी १८ ते ४५ एवढे निश्चित करण्यात आले आहे.

- Advertisement -

मेगाभरतीच्या जागा

राज्य परिवहन महामंडळ (४८३३), कृषिसेवक (१४१६), कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (४०५), भारतीय रेल्वे (१४०३३), महापालिका व जि. प. (१२हजार) यांसह सोलापूर महापालिकेच्या ४५ जागांसाठीही जाहिराती प्रसिद्ध झाली आहे.

हेल्पडेस्कवर माहिती मिळवा

मेगाभरतीसाठी तयारी करताना परीक्षार्थींनी इंग्रजी, मराठी, भाषा, सामान्य ज्ञान, बुद्धीमत्ता चाचणी या घटकांवर विशेष लक्ष द्यावे. बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करावा. ऑनलाइन परीक्षा असल्याने संगणकाची माहिती करून घ्यावी. विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी युनिव्हर्सल फाउंडेशनतर्फे हेल्पडेस्क (८८०६३८८८२२) सुरु करण्यात आले असून ते सर्वांसाठी विनामूल्य असेल.

-प्रा. राम खैरनार, (युनिव्हर्सल फाउंडेशन)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -