घरमहाराष्ट्रजेएनपीटीची संयुक्त अरब अमिरातीसोबत व्यापारी भागीदारी

जेएनपीटीची संयुक्त अरब अमिरातीसोबत व्यापारी भागीदारी

Subscribe

मालवाहतुकीसाठी शारजाह-जेएनपीटी-शारजाह नवीन मार्गाची सुरुवात

भारताचा आणि पर्यायाने जेएनपीटीचा परदेश व्यापार वाढावा यासाठी आत्ता संयुक्त अरब अमिरात (यूएई) आणि भारत समुद्री मार्गावर आता शारजाह कंटेनर टर्मिनल-जेएनपीटी-कांडला-जेएनपीटी असा नवीन सागरी मार्ग सुरू करण्यात आला आहे. सन मरीन शिपिंग सर्व्हिसच्या एमव्ही पोर्ट क्लाग या मालवाहू जहाजाने शारजाह कंटेनर टर्मिनल ते जेएनपीटी असा पहिला प्रवास केला. हे मालवाहू जहाज रविवारी 17 मार्च जेएनपीटीला पोहचले.

हे मालवाहू जहाज शारजाहच्या पोर्ट खालिद ते जेएनपीटी आणि भारताच्या पश्चिम भागातील इतर बंदरांना जलद आणि थेट सेवा देणार आहे. ही सेवा भारताचे शेवटचे बंदर ते शारजाह 3 दिवसात पूर्ण करणार आहे. जगभरातील अव्वल असलेल्या 30 कंटेनर बंदरामध्ये जेएनपीटी एकमेव भारतीय बंदर आहे. या बंदराच्या परिवर्तनाच्या पुढील टप्प्यासाठी आवश्यक असणारी कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवनविन उपाय योजना जेएनपीटीकडून राबविण्यात येत आहेत. नेव्हिगेशनल चॅनेलची खोली वाढविण्यात येत आहे. 15 मीटरपर्यंतचे ड्रेजिंग पूर्ण झाले आहे. त्यामुळे 12 हजार 500 टीयूईपेक्षा जास्त मालवाहतूक करणारी जहाजे हाताळता येणार आहेत.

- Advertisement -

या नवीन सेवेविषयी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले की, जेएनपीटी भारतातील नंबर एकचे बंदर आहे. त्याची कार्यक्षमता अधिक नाविन्यपूर्ण व सुधारण्यासाठी तसेच व्यापारात वाढ करण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करीत आहे. आम्ही आयात-निर्यातदारांना सुलभ ग्राहक सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. संयुक्त अरब अमीरात (यूएई) आपले बंदर विकसित करीत आहोत. आशिया, आफ्रिका आणि युरोप या माध्यमातून सुयोग्यरीत्या जोडले गेल्यामुळे जागतिक व्यापारासाठी हे प्रमुख स्थान बनत आहे. त्यामुळे दोन्ही देशातील समुद्री व्यापार संबंध आशियातील मेरीटाईम क्षेत्राचा विकास करण्यास मदत करतील. जागतिक बाजारपेठेच्या वाढीसाठी नवीन मार्ग सुरु होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -