घरठाणेम्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीकरिता अर्ज दाखल करण्यास 19 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीकरिता अर्ज दाखल करण्यास 19 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

Subscribe

म्हाडाचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (Mhada Konkan Lottery 2023) ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे.

म्हाडाचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (Mhada Konkan Lottery 2023) ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. (mhada konkan lottery 2023 deadline for submission of applications for mhada konkan mandal lottery has been extended till april 19 VVP96)

ठाणे शहर-जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 4640 सदनिका व 14 भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्याकरिता 19 एप्रिल 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच, 21 एप्रिल 2023, शुक्रवारी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन व आरटीजीएस / एनइएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी मुदत देण्याचा निर्णय म्हाडाकडून घेण्यात आला आहे.

- Advertisement -

नूतन संगणकीय प्रणालीतील बदल

  • अनेकांना अर्ज करता यावे यासाठी IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management system) या नूतन संगणकीय प्रणालीतील अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेत काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.
  • नवीन बदलांनुसार, सोडतीतील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे पीएमएवाय नोंदणी प्रमाणपत्र असणे बंधनकारक नसेल.
  • सदर प्रमाणपत्र सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी मिळवणे गरजेचे आहे.
  • सदर सोडतीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेअंतर्गत 984 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

ऑनलाईन अर्ज पद्धतीत अनेक बदल

- Advertisement -

सोडतीत अर्जदाराचे उत्पन्न दर्शविण्यासाठी आयकर परतावा प्रमाणपत्र (Income Tax Return certificate) प्रणालीमध्ये अपलोड करावे लागते. मात्र, हे प्रमाणपत्र अपलोड केल्यावर प्रणाली Optical Character Recognition करून पोचपावतीचा क्रमांक, एकूण उत्पन्न, मूल्यांकन वर्ष व नाव या बाबी तपासते. मात्र, अर्जदारांनी अस्पष्ट, चुकीचे आयकर परतावा प्रमाणपत्र अपलोड केल्यामुळे अर्जदाराचे उत्पन्न निश्चितीस अडचणी येत होत्या. त्यामुळे आता अर्जदाराने आयकर परतावा प्रमाणपत्र प्रणालीमध्ये अपलोड केल्यावर अर्जदाराचे एकूण उत्पन्न, मूल्यांकन वर्ष व नाव या बाबतची माहिती एका चौकटीत (Pop Up) दर्शविली जाणार आहे.

सदर माहिती अचूक असल्यास अर्जदाराकडून चेक बॉक्समध्ये संमती घेतली जाणार आहे. मात्र, सदर माहिती प्रणालीत अपलोड केलेल्या आयकर परतावा प्रमाणपत्रातील माहितीशी जुळत नसल्यास अर्जदाराला सदर माहितीत सुधारणा/बदल करण्याची सुविधाही आता प्रणालीत देण्यात आली. सदर चेक बॉक्स तपासल्याशिवाय अर्जदाराला अर्ज भरणा करण्याविषयीची पुढील प्रक्रिया करता येणार नाही.

महिला अर्जदारांच्या विवाहानंतरच्या नाव, आडनाव भरण्याबाबतचे अडथळे दूर

  • या प्रणालीत नोंदणी करताना महिला अर्जदारांना विवाहानंतर नाव, आडनाव बदलल्यामुळे किंवा इतर कारणामुळे येणार्‍या अडचणी विचारात घेता अर्जं नोंदणी प्रणालीच्या पानावर आता नवीन पर्याय अर्जदाराला देण्यात आला आहे.
  • या पर्यायानुसार अर्जदार दुसर्‍या नावाने ओळखला जात असल्यास त्याचा होकार किंवा नकार घेतला जाणार आहे.
  • अर्जदाराने होकार लिहिल्यास अर्जदाराने त्याचे दुसरे नाव नमूद करावयाचे आहे.
  • या सुविधेमुळे विवाहानंतर नाव, आडनाव बदललेल्या अर्जदारांना नोंदणी करता येणार आहे.

‘प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य’

  • ‘प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य’ या योजनेतील यशस्वी विजेत्यांनी मंडळातर्फे प्रथम सूचना पत्र (Provisional Offer Letter) जारी करण्याच्या अगोदर सदनिका नाकारली तर सदनिका परत करणार्‍या विजेत्यांची अनामत रक्कम परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • प्रथम सूचना पत्र प्राप्त झाल्यानंतर विजेत्या अर्जदाराने सदनिका नाकारल्यास सदनिकेच्या एकूण विक्री किंमतीच्या एक टक्के रक्कम कपात करुन अर्जदाराला अनामत रक्कम परत केली जाणार आहे.
  • प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 2048 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सोडत कधी निघणार?

  • सदनिका व भूखंड विक्रीसाठी ऑनलाईन संगणकीय सोडत 10 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे.
  • आतपर्यंत 22,380 अर्जदारांनी सोडतीसाठी अर्ज केले असून त्यापैकी 12360 अर्जदारांनी अर्जासह आवश्यक अनामत रक्कम देखील भरली आहे.
  • सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी 4 मे 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
  • 10 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार आहे.
  • अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर SMS, Email द्वारे व ऍपवर प्राप्त होणार आहे.
  • सोडतीसंदर्भात अर्ज भरतांना अर्जदारांना येणार्‍या अडचणीचे निराकरण करण्यासाठी 022-69468100 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा – मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर; पण प्रवास अद्याप स्वस्तच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -