घरमहाराष्ट्रम्हाडाच्या पुणे मंडळातर्फे २१९० सदनिकांची संगणकीय सोडत

म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे २१९० सदनिकांची संगणकीय सोडत

Subscribe

पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या २१९० सदनिकांच्या विक्रीसाठी आज संगणकीय सोडत काढण्यात आली.

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या २१९० सदनिकांच्या विक्रीसाठी आज संगणकीय सोडत काढण्यात आली. या सोडतीसाठी सुमारे ३० हजार अर्ज प्राप्त झाले. पुणे म्हाडा कार्यालयाच्या कॅम्प परिसरातील नेहरू मेमोरियल हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला पुणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील, उच्च स्तरीय देखरेख समितीचे सदस्य कुंडलिक पाटील, दीपक नलावडे, धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

mhada to conduct lottary for 2190 home
पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या विविध गृहनिर्माण योजनेतील २१९० सदनिकांच्या विक्री सोडतीचा शुभारंभ करताना पुणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर. समवेत पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील, उच्च स्तरीय देखरेख समितीचे सदस्य पुंडलिक पाटील, दीपक नलावडे, धनंजय कुलकर्णी आदी.

‘म्हाडाच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे  उपलब्ध’

‘वाढत्या शहरीकरणामुळे मोठ्या शहरांमध्ये परवडणाऱ्या दरात घर घेणे सर्वसामान्यांना शक्य होत नाही. म्हाडाच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे  उपलब्ध होत आहेत. आजच्या सोडतीला अर्जदारांचा मिळालेला भरघोस प्रतिसाद हे त्याचेच द्योतक आहे’, असे राजेंद्र निंबाळकर म्हणाले.

- Advertisement -

‘या’ सदनिकांचा समावेश

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तळेगाव दाभाडे (पुणे), सांगली, म्हाळुंगे (पुणे), करमाळा (जि. सोलापूर) येथील अत्यल्प गटातील ३७१ सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत म्हाळुंगे (पुणे), सांगली येथे अत्यल्प गटातील ५८, मध्यम उत्पन्न गटातील सांगली, पिंपरी वाघिरे येथील १०० सदनिका आणि उच्च उत्पन्न गटातील पिंपरी वाघिरे येथील ६५ सदनिकांचा आजच्या सोडतीत समावेश होता. २० टक्के अंतर्गत सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगर पालिका हद्दीत अल्प उत्पन्न गटासाठीच्या ७३७ सदनिका, पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीतील ७९२ सदनिका आणि कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील ६७ सदनिकांचाही या सोडतीत समावेश होता.

सोडतीच्या ठिकाणी सेल्फी पॉईंट

सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जदारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी २० नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी १० वाजेपासून १९ डिसेंबर २०१९ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत मुदत देण्यात आली आहे. या संगणकीय सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंगच्या माध्यमातून करण्यात आले. वेबकास्टिंगच्या माध्यमातून भारतासह विविध देशातील सुमारे १६ हजार नागरिकांनी या सोडतीचे थेट प्रक्षेपण घर बसल्या बघितले. विजेत्या अर्जदारांकरीता छायाचित्र काढण्यासाठी सोडतीच्या ठिकाणी सेल्फी पॉईंट देखील उभारण्यात आला होता.

- Advertisement -

‘ही’ खबरदारी घ्या

दरम्यान, सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजन्ट नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास पुणे मंडळ कोणत्याही व्यवहारास किंवा फसवणुकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन ‘म्हाडा’तर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -