घरताज्या घडामोडीDhananjay Munde Heart Attack: मंत्री धनंजय मुंडेंना हृदयविकाराचा सौम्य झटका; प्रकृती स्थिर...

Dhananjay Munde Heart Attack: मंत्री धनंजय मुंडेंना हृदयविकाराचा सौम्य झटका; प्रकृती स्थिर असल्याची टोपेंची माहिती

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना काल, मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे (Dhananjay Munde Heart Attack) त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या धनंजय मुंडेंवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी (Rajesh tope) दिली आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचार सुरू केले. डॉक्टरांनी त्यांची सर्व तपासणी केली असून सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. मात्र पुढील सहा ते सात दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मागच्या काही दिवसांत धावपळ होत असल्यामुळे असे झाले असून त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे सांगितले आहे. तसेच धनंजय मुंडेंना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे धोका नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

धनंजय मुंडेंना रुग्णालयात दाखल केल्यानंतर लगेचच नेतेमंडळींना त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. यादरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘धनंजय मुंडे यांची प्रकृती अतिशय ठीक आहे. काळजी करण्याचे काहीच कारण नाही. आवश्यक असलेल्या सर्व तपासण्या झाल्या असून सर्वकाही ठीक आहे. मी त्यांच्यासोबत जवळपास अर्धातास चर्चा केली आणि गप्पा मारल्या. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर आज सगळं अधिक जास्त सांगू शकतील.’

- Advertisement -

दरम्यान सोमवारी धनंजय मुंडे परभणीला गेले होते. त्यानंतर काल त्यांचा जनता दरबार होता. त्यामुळे कामाच्या ताणामुळे असे होऊ शकते. पुढील तीन ते चार दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याची माहिती टोपेंनी दिली.


हेही वाचा- Maharashtra Corona Update : राज्यात आज 113 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर मुंबईत 52 नवे रुग्ण


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -