घरमहाराष्ट्रMLA Disqualification Case : आमदार अपात्रतेचा निकाल 10 जानेवारीलाच? अध्यक्षांकडून मसुदा कायदे...

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेचा निकाल 10 जानेवारीलाच? अध्यक्षांकडून मसुदा कायदे तज्ज्ञांकडे

Subscribe

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 10 जानेवारीपर्यंत देणे अनिवार्य आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा नेमका काय निकाल लागतो? याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 10 जानेवारीपर्यंत देणे अनिवार्य आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा नेमका काय निकाल लागतो? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. तर या प्रकरणाचा संपूर्ण निकाल तयार असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा अध्यक्षांनी या निकालपत्राच्या मसुद्यावर कायदेशीर अभिप्राय घेण्यासाठी दिल्लीतील कायदेतज्ज्ञांकडे पाठवला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे 10 जानेवारीलाच या प्रकरणाचा निकाल समोर येणार आहे. परंतु, या निकालाचा मसुदा जर का बरोबर असेल तर अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवार, 10 जानेवारीपर्यंतची वाट न पाहता उद्याच हा निकाल लावू शकतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंहली आहे. तर निकालपत्राचा मसुदा हा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडे पाठवल्याची माहिती एका वृत्तपत्राकडून देण्यात आली आहे. (MLA disqualification result on January 10 only? Draft Laws from Assembly Speaker to Legal Experts)

हेही वाचा… ‘Ajit Pawar, Mushrif, Patel बेडकाप्रमाणे उड्या मारुन BJPच्या आश्रयाला’, ED कारवाईवरुन ठाकरेंची टीका अन् टोले

- Advertisement -

जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपासोबत सत्ता स्थापन केली. ज्यानंतर शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टानेही आपल्या निकालात आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे म्हटले. परंतु, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी दिरंगाई होत असल्याचा आरोप ठाकरे गटातील आमदारांकडून करण्यात आला. ज्यानंतर या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करत अध्यक्षांना 30 डिसेंबर 2023 पर्यंत निकाल लावण्यास सांगितले होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी आणखी 10 दिवसांची मुदतवाढ करून घेत 10 जानेवारीला हा निकाल लावण्याचे निश्चित केले. त्यानुसार आता बुधवारी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा अंतिम निकाल येणार आहे.

पण महत्त्वाची बाब म्हणजे निवडणूक आयोगाप्रमाणेच विधानसभा अध्यक्ष सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झुकते माप देण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी करण्यास सांगितले आहे. ज्यामुळे देशाच्या इतिहासात या घटनेकडे ऐतिहासिक राजकीय घटना म्हणून पाहिले जात आहे. पण हा निकाल आधीच फिक्स असून यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पारडे आणखी जड होणार आहे, असे खुद्द मुख्यमंत्र्यांच्याच गोटातील आमदारांकडून सांगण्यात येत आहे. तर, दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल रविवारी (ता. 07 जानेवारी) भेट घेतल्याने राजकीय वर्तुळातील विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आता पुढील दोन दिवसांत राज्याच्या राजकारणात आणखी एका भुकंपाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -