घरमहाराष्ट्रकायदा काय असतो हे नारायण राणेंना कळून चुकले - वैभव नाईक

कायदा काय असतो हे नारायण राणेंना कळून चुकले – वैभव नाईक

Subscribe

शिवसेनेची रस्त्यावरची ताकद नारायण राणे व त्यांच्या मुलांनी आज अनुभवली

मी केंद्रीय मंत्री आहे माझं कोणी काही करू शकत नाही अशा अविर्भावात राहणाऱ्या नारायण राणेंना कायदा काय असतो हे कळून चुकले आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कायद्याच्या पुढे कोणीही नेता, मंत्री मोठा नाही हे ठाकरे सरकारने दाखवून दिले. शिवसेनेची रस्त्यावरची ताकद नारायण राणे व त्यांच्या मुलांनी आज अनुभवली आहे. यापुढेही ठाकरे सरकारमध्ये कायद्याचे राज्य चालणार आहे. त्यामुळे उद्धवजी ठाकरे यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

गेले कित्येक दिवस शिवसेनेवर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या, शिवसेनेवर विनाकारण टीका करणाऱ्या, शिवसैनिकांना आव्हान देणाऱ्या नारायण राणेंना आज शिवसैनिकांनी अद्दल घडविली आहे. शांत असलेली शिवसेना वेळप्रसंगी रौद्र रूप धारण करू शकते.यापुढच्या काळातही कोण अंगावर येत असेल तर शिंगावर घेण्याची ताकद संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये आहे. यापुढेही कोण अंगावर येत असेल तर जशास तसे उत्तर दिले जाणार आहे. असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.

- Advertisement -

असे आहे प्रकरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. १५ ऑगस्टला ठाकरे यांनी देशाच्या स्वांतत्र्यदिनावरून भाष्य केले होते. त्यावरूनच राणे यांनी ठाकरे यांना लक्ष्य केलं. ठाकरेंना स्वातंत्र्यदिनाला किती वर्ष झाले हे माहित नाही. म्हणून भाषणावेळी ते सतत मागे बघून कोणाला तरी विचारत होते. मुख्यमंत्र्याचे हे वागणे बरोबर नाही मी जर तिथे असतो तर त्यांच्या कानाखाली मारलं असते. असे खळबळजनक विधान राणे यांनी केले होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानावरून आज मुंबई, ठाणे, नाशिक, रत्नागिरी येथे शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -