घरमहाराष्ट्र'सर्व सत्ताधीश नेत्यांची उत्तरं ऐका...'; गडकरी- फडणवीसांचा व्हिडीओ ट्वीट करत मनसेचा टोला

‘सर्व सत्ताधीश नेत्यांची उत्तरं ऐका…’; गडकरी- फडणवीसांचा व्हिडीओ ट्वीट करत मनसेचा टोला

Subscribe

मनसेनं केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उत्तरं ट्वीट करत टीका केली आहे. राज्यकर्ते हे हतबल आहेत आणि कंत्राटदार मात्र मस्तवाल, अशी स्थिती या महामार्गाची झालीय का? असा सवाल मनसेनं ट्वीट करत उपस्थित केला आहे.

मुंबई- गोवा महामार्गासंदर्भात अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. मुंबई- गोवा महामार्गावर दरवर्षी पडणारे खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असतात. परंतु वर्षानुवर्ष यावर कोणताही तोडगा सरकारला काढता आलेला नाही. त्यावरच आता मनसेनं केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उत्तरं ट्वीट करत टीका केली आहे. राज्यकर्ते हे हतबल आहेत आणि कंत्राटदार मात्र मस्तवाल, अशी स्थिती या महामार्गाची झालीय का? असा सवाल मनसेनं ट्वीट करत उपस्थित केला आहे. ( MNS Adhikrut Tweet about Mumbai Goa National Highway and blaimed BJP MNS tweeted Nitin Gadkari and Devendra Fadnavis answers )

मनसेच्या ट्वीटमध्ये काय?

मनसेनं त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर गडकरी आणि फडणवीस या दोघांनी सभागृहात उत्तर देतानाची क्लिप टाकली आहे. त्यात मनसेनं म्हटलं आहे की, अखेर मुंबई- गोवा हायवेसाठी राज्यकर्त्यांनीही हात टेकले. सर्व सत्ताधीश नेत्यांची उत्तर ऐका.. असे हतबल राज्यकर्ते आणि मस्तवाल कंत्राटदार असतील तर कोकणी बांधवाने कोणाकडे दाद मागायची? हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रखर राजकीय इच्छाशक्ती हवी असं मनसेनं या ट्वीट मध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: प्रजासत्ताक हा ‘भयभीत प्रजासत्ताक’मध्ये रुपांतरित होईल; प्रकाश आंबेडकरांचं भाकित )

- Advertisement -

गडकरी- फडणवीस काय म्हणाले?

मुंबई- गोवा महामार्गाबाबत विचारलेल्या प्रश्नावर गडकरी यांनी लोकसभेत आणि फडणवीस यांनी विधान परिषदेत उत्तर दिलं होतं. त्याचे हे व्हिडीओ मनसेने शेअर केले आहेत.

गडकरी म्हणाले आहेत की, मुंबई- गोवा महामार्गाच्या कामाबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर देताना माझ्या मनात अपराधीपणाची भावना येत आहे. देशात मुंबई- गोवा या मार्गावर पुस्तक लिहिता येईल. या महामार्गाचं काम रखडल्याबद्दल माझ्याकडे उत्तर नाही.

तर दुसरीकडे फडणवीस म्हणाले आहेत की, या महामार्गाच्या कामात अनेक अडचणी येत आहेत. कधी कायदेशीर, कधी कंत्राटदारांच्या अडचणी आहेत. त्यामुळे राज्य सरकारसमोर अडचणीची स्थिती निर्माण होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: सुद्धा यासाठी प्रयत्न केले आहेत. गडकरी हे देशात रेकॉर्डब्रेक काम करत आहेत, रस्ते बांधत आहेत. परंतु या रस्त्यांच्या कामात अनेक अडचणी येत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -