घरमहाराष्ट्रसुसंस्कृत मतदारसंघात हाणा-माऱ्या करायला हे बिहार राज्य नाही, प्रभादेवी राडाप्रकरणी मनसेची टीका

सुसंस्कृत मतदारसंघात हाणा-माऱ्या करायला हे बिहार राज्य नाही, प्रभादेवी राडाप्रकरणी मनसेची टीका

Subscribe

शिवसेना – शिंदे गटात मध्यरात्री झालेल्या राडाप्रकरणी २५ जणांवर गुन्हे दाखल झाले असून ५ जणांना अटक करण्यात आली आहे. शिंदे गटातील संतोष तेलवणे यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून अटक केलेल्यांमध्ये शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांचाही समावेश आहे.

मुंबई – दादर माहिम, प्रभादेवी हे सुसंस्कृत मतदारसंघ आहेत. अशा प्रकारच्या हाणामाऱ्या करायला हे बिहारी राज्य नाही. पोलिसांनी योग्य ती चौकशी करावी आणि जे दोषी असतील, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

मनसे नेते संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, शिवसेनेने जे अडीच वर्षांत पेरलंय, ते आता उगवतंय. तुम्ही अडीच वर्षांत लोकांवर खोट्या केसेस टाकल्या. त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर आणि संतोष धुरीवर खोटी केस टाकली की महिला कॉन्स्टेबलला धक्का दिला म्हणून. ती महिला कॉन्स्टेबल आता आहे कुठे? त्यांचं स्टेटमेंट नाही, काही नाही. गेल्या अडीच वर्षांत अशा अनेक खोट्या केसेस तुम्ही लोकावंर टाकल्या, त्यामुळे जे पेरलंय, ते उगवतंय.

- Advertisement -

हेही वाचा – प्रभादेवी राडाप्रकरणी २५ जणांवर गुन्हा दाखल, पाचजण अटकेत; शिंदे गटाच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई

दरम्यान, शिवसेना – शिंदे गटात मध्यरात्री झालेल्या राडाप्रकरणी २५ जणांवर गुन्हे दाखल झाले असून ५ जणांना अटक करण्यात आली आहे. शिंदे गटातील संतोष तेलवणे यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून अटक केलेल्यांमध्ये शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांचाही समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शिवसेना आणि शिंदे गट मध्यरात्री भिडले, दोन्ही गटात हाणामारी; सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप

महेश सावंत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन संतोष तेलवणे यांना मारहाण केली. या कार्यकर्त्यांनी २० ते २५ कार्यकर्ते बांबू, चॉपर, लाठ्या काठ्यांसह संतोष तेलवणे यांना मारहाण केली, असा आरोप संतोष यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. तसंच, मारहाणीत आणि धावपळीत महेश सावंत यांच्या गळ्यातील ३० ग्रॅम सोन्याची चैन, पंचमुखी रुद्राक्षासह पळवून नेली अशीही तक्रार त्यांनी केली. महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत, विनायक देवरुखकर, विपुल ताटकर, यशवंत विचले आदींसह २० ते २५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -