घरमहाराष्ट्रजीव जाता कामा नये यासाठी यंत्रणेची चौकशी करा - संदिप देशपांडे

जीव जाता कामा नये यासाठी यंत्रणेची चौकशी करा – संदिप देशपांडे

Subscribe

पुण्यात कोरोना संसर्गामुळे पत्रकार पांडुरंग रायकर यांचं निधन झालं. वेळेत अँम्ब्युलन्स उपलब्ध होऊ न शकल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जम्बो कोविड सेंटरमधून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सच मिळाली नाही. ज्यावेळी अँब्युलन्स उपलब्ध झाली, तेव्हा खूप उशिर झाला होता. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. यावर आता मनसे नेते संदिप देशपांडे यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. जीव जाता कामा नये यासाठी यंत्रणेची चौकशी करा, असा सल्ला संदिप देशपांडे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

- Advertisement -

मनसे नेते संदिप देशपांडे यांनी ट्विट करत राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. “जीव गेल्यावर चौकशी लावण्यापेक्षा जीव जाता कामा नये म्हणून यंत्रणेची चौकशी करा!” असं ट्विट त्यांनी केलं आहे. दरम्यान, पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ट्रिटमेंट प्रोटोकॉलमध्ये कमतरला झाली का? याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातांना हे आदेश देण्यात आले आहेत.

वेळेत अँब्युलन्स न मिळणे हे दुर्देवी – राजेश टोपे

“या घटनेमध्ये वेळेत अँब्युलन्स न मिळणे हे दुर्देवी आहे, याचं समर्थन होऊ शकत नाही. अशा घटना घडू नये म्हणून आपण नियम बनवलेत. त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कुठल्याही परिस्थितीत आपण अँब्युलन्स भाड्याने घ्या आणि रुग्णांना मोफत योग्य संख्येने सुविधा पुरवा, असे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र, तरीही अशा घटना घडणं हे निषेधार्ह आहे. या प्रकरणाची चौकशी करू आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत याची योग्य ती काळजी घेऊ,” असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -