घरताज्या घडामोडीहोर्डिंग लावताना तीघांचा मृत्यू, अभिनेत्याला वाढिवसाच्या शुभेच्छा देणं पडलं भारी!

होर्डिंग लावताना तीघांचा मृत्यू, अभिनेत्याला वाढिवसाच्या शुभेच्छा देणं पडलं भारी!

Subscribe

दाक्षिणात्या सुपरस्टार पवन कल्याण याचा आज वाढदिवस आहे. पवनला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या काही चाहत्यांनी ४० फूट उंचीचे एक पोस्टर तयार केले. पण हे पोस्टर लावत असताना विजेचा झटका बसल्यामुळे तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. या मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना निर्माता बोनी कपूर यांनी आर्थिक मदत देण्याचे वचन दिलं आहे.

- Advertisement -

मंगळवारी चितूर जिल्ह्यातील कनमलदोड्डी गावात हा अपघात घडला. पवन कल्याणला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या गावात एक भले मोठे पोस्टर उभारले जात होते. हे पोस्टर लावत असताना तीन लोकांना विजेचा जबरदस्त झटका बसला. अचानक बसलेल्या झटक्यामुळे त्या तीन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. या दूर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना व जखमींना मदत करण्याची जबाबदारी बोनी कपूर यांनी स्विकारली आहे.

बोनी कपूर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आज आम्ही तीन प्रशंसक गमावले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सामील आहोत. या प्रतिकूल परिस्थितीत आम्ही चाहत्यांसोबत उभे आहोत. या अपघातात ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाखांची मदत करत आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळो.” अशा आशयाचे ट्विट करुन बोनी कपूर यांनी केलं आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – राधे माँने ऑफर स्विकारली, आता Bigg Boss 14 गाजवणार!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -