घरक्राइमBhujbal on Fadnavis : यात गृहमंत्री काय करणार? फडणवीसांच्या मदतीला धावले भुजबळ

Bhujbal on Fadnavis : यात गृहमंत्री काय करणार? फडणवीसांच्या मदतीला धावले भुजबळ

Subscribe

आरोपी मॉरिस हा दोन वर्ष तुरुंगात जाऊन आलेला आहे मग त्याच्याकडे शस्त्र कसे काय आले?, असा सवालही छगन भुजबळ यांनी केला आहे.

मुंबई : दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अभिषेक घोसाळकर आणि आरोपी मॉरिसने फेसबुक लाइव्हवर संवाद साधला. यानंतर मॉरिसने घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर विरोधकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र यावर गृहमंत्री काय करू शकतो, असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली.

या घटनेनंतर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली आहे? या छगन भुजबळ म्हणाले, “मी स्वत: गृहमंत्री होतो. या परिस्थितीत गृहमंत्री काय करू शकतो ? तुम्ही तुमचे मित्र घरात घेऊन बसले आहेत. तुमचे नातेवाईक घरात घेऊन बसले आहात. याला गृहमंत्री काय करू शकतात? दहशतवाद वाढला आहे, चोऱ्यांवर नियंत्रण ठेवा, बंदोबस्त नीट ठेवा, दंगे कुठे होत असतील तर त्यावर नियंत्रण मिळवा, अशा बाबतीत गृहमंत्री पोलिसांना सांगत असतात. बंदोबस्तच्या ठिकाणी गुन्हेगारी वाढली असेल, तर ती नियंत्रणात आणा. या पलिकडे गृहमंत्री काय सांगू शकतात. प्रत्येकाला संरक्षण देऊ शकत नाही. ही तुमच्या घरातील माणसे आहेत ना. तुमच्या बरोबरी माणसे आहेत. त्याला गृहमंत्री काय करू शकतात?”

- Advertisement -

हेही वाचा – DCM Fadnavis: वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडली; अभिषेक घोसाळकर गोळीबारप्रकरणी फडणवीसांची प्रतिक्रिया

पोलीस काय प्रत्येकाच्या घरात जाणार का?

अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी छगन भुजबळ म्हणाले, “मला खूप वाईट वाटले. कारण अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी अनेक वर्ष महानगरपालिकेत त्यांनी माझ्यासोबत काम केले होते. नंतर त्यांनी आमदार म्हणून देखील काम केले, विनोद घोसाळकरांचा मुलगा सुशिक्षित होता. पण हे किती दुर्दैव आहे की, कार्यक्रमाला जातात, आणि फेसबुक लाइव्हवर संवाद साधतात आणि तिथेच त्यांची हत्या होते. लोकांना नेमके काय झाले ? त्या आरोपीने स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केली. घोसाळकरांचा मुलगा चांगला आहे. पण त्याला पोलीस तरी काय करतील. फेसबुक लाइव्ह सुरू असताना तुम्ही काय करू शकता का? एखादी वक्ती खिशातून बंदूक काढून गोळ्या झाडायच्या हे कसे काय होईल, यांचा अंदाज कसा बांधायचा. आता पोलीस काय प्रत्येकाच्या घरात जाणार का? तुम्ही तुमचे मित्र घेऊन बसतात.  पोलीस हे चोरी, दंगल, गँगवार आणि दहशतवाद यासारख्या घटनांचा बंदोबस्त करतात. ज्या लोकांनी सरक्षण मागितले आहे, त्यांना संरक्षण देण्याचे काम हे पोलिसांचे आहे. पण आता घरातीलच माणसे हे दोन मित्रांमध्ये असे घडत आहे. कधी कधी डोके चक्रावून जाते की, कोणावर विश्वास ठेवायचा. फार भयंकर प्रकार घडत आहेत.”

- Advertisement -

 

हेही वाचा – Uday Samant : मॉरिस-घोसाळकर गॅंगवार उबाठा गटातीलच; सामंतांचा ठाकरे गटावर थेट हल्ला

मॉरिस तुरुंगात होता, बंदूक कसे आले?

बंदुकीचे लायसन्स देताना काही नियम कठोर करण्याची आवश्यकता आहे का? असे विचारल्यावर छगन भुजबळ म्हणाले, “नियम कठोर करायलाच पाहिजेच. एखादी व्यक्ती वाईट मार्गाने जात आहे आणि त्या व्यक्तीकडे बंदूक असेल, तर ती काढून घ्यायला पाहिजे. बंदूक देताना सुद्धा संभाळून दिली पाहिजे. अनेक कारणे सांगून लोक बंदूक मागणत असतात. पण एखादी व्यक्ती करणारी असेल तर, तिच्याकडे लक्ष ठेवले पाहिजे. या प्रकरणातील आरोपी मॉरिस हा दोन वर्ष तुरुंगात जाऊन आलेला आहे मग त्याच्याकडे शस्त्र कसे काय आले?, असा सवालही छगन भुजबळांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -