घरताज्या घडामोडीपंतप्रधानांचं कौतुक ही आनंदाची गोष्ट पण..., खासदार अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण

पंतप्रधानांचं कौतुक ही आनंदाची गोष्ट पण…, खासदार अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचा प्रयोग साताऱ्यात होणार आहे. परंतु त्यांच्या महानाट्याच्या प्रयोगाला संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, देशाचे पंतपधान नरेंद्र मोदी यांनी अमोल कोल्हे यांच्या एका भाषणाचं कौतुक केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, डॉ. अमोल कोल्हे यांनी कराड येथे पत्रकार परिषद आयोजित करत महानाट्यासह राजकीय चर्चांना पूर्णविराम दिलं.

लोकसभेत तुम्ही केलेल्या एका भाषणाचं नरेंद्र मोदींनी कौतुक केलं. तुम्हाला आता भाजपाकडून काही ऑफर आहे का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता कोल्हे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझं कौतुक केलं ही आनंदाची गोष्ट आहे. पण हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. तुम्ही एका पेपरमध्ये काम करत असताना, तुमच्या बातमीचं दुसऱ्या पेपरच्या संपादकांनी कौतुक केलं तर मी तुम्हाला विचारायचं का की तुम्ही नोकरी सोडताय?, कौतुकाला संधी कसं मानायचं?, आधी ऑफर तर यायला हवी. सध्या एकच ऑफर आहे, शिवपुत्र संभाजी महानाट्य बघायला या, ते जास्त महत्त्वाचं आहे. राजकारण आणि इतर विषय होतच असतात आणि ते फक्त पाच वर्ष असतं, असं अमोल कोल्हे म्हणाले.

- Advertisement -

माझ्या भाजप प्रवेशाच्या चर्चा अकारण घडवल्या जात आहेत. जे लोक या चर्चा घडवतात त्यांना प्रश्न विचारणं संयुक्तिक ठरेल. संसदेच्या अधिवेशनात पार्लमेंटच्या फ्लोअरवर उभं राहून मी जी भूमिका मांडतो, मी जे भाषण करतो ते जास्त बोलतं, कोणीतरी कोणाच्या तरी कानात सांगतं, त्या कानगोष्टींना उत्तर देण्यापेक्षा मी संसदेत जे बोलतो ती भूमिका जास्त अधिक मानली पाहिजे, असंही अमोल कोल्हे म्हणाले.


हेही वाचा : अमित शाह मुंबईत तर चंद्रकांत पाटील कोल्हापुरात, ‘त्या’ वक्तव्यावरून नाराजी?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -