घरमहाराष्ट्रमी नाडी धरून जप केला तर मरणाजवळ असलेला रुग्णही वाचतो

मी नाडी धरून जप केला तर मरणाजवळ असलेला रुग्णही वाचतो

Subscribe

खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अजब विधानाने खळबळ

मी रुग्णाची नाडी धरून जप केला तर रुग्ण बरे होतात, असे अजब विधान औरंगाबादमधील शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. विशेष म्हणजे हा अजब दावा त्यांनी राज्य सरकारच्या आरोग्य मेळाव्यात केला आहे. त्यावेळी समोर अनेक डॉक्टर्सही बसलेले होते. भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांना रुग्णालयात जाऊन मला भेटता आले नाही, त्यामुळेच मी जीवनात अयशस्वी झाल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे वैद्यकीय, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही चर्चा सुरू झाली आहे.

राज्य सरकारच्या कार्यक्रमातच रुग्णांच्या उपचाराबाबत असे अजब दावे केल्याने खैरेंवर टिकेचा भडीमार होत आहे. यावेळी भाषणात खैरे यांनी रुग्णांना आरोग्यबाबत उपदेश दिले. माझ्याकडे डॉक्टरची डिग्री नाही, मात्र मी अनेकांना बरे केले आहे. मी नाडीला हात लावून जप केल्यावर संध्याकाळपर्यंत संबंधित रुग्णाचा मृत्यू होणार आहे असे डॉक्टरांनी ज्यांच्याविषयी म्हटले आहे असे रुग्णही बरे झाल्याचे खैरे म्हणाले.

- Advertisement -

प्रमोद महाजन रुग्णालयात असताना गोपीनाथ मुंडे यांनी महाजन यांच्या तब्बेतीच्या सुधारणेविषयी काही तरी करा, असे मला सांगितले. त्यावेळी मी एक पुडी प्रमोद महाजन यांच्या उशीखाली ठेवायला सांगितली, असेही खैरे म्हणाले. महाजन १२ दिवस जिवंत होते. त्यांच्या खोलीत कुणालाच प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे या पुडीला हात लावून जप करता आला नाही. त्यामुळे जीवनात मी पहिल्यांदाच फेल झालो, अशी वक्तव्ये केल्यावर खैरे यांनी ही अंधश्रद्धा नसल्याचेही सांगितले. प्रमोद महाजन यांच्यावर त्यांच्या भावाने गोळीबार केला होता, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

काय म्हणाले खैरे ?
प्रमोदजी ज्यावेळी रूग्णालयात होते तेव्हा मला गोपीनाथ मुंडे म्हणाले की, तू काहीतरी कर. सिद्धिविनायक मंदिरात जा काहीतरी फूल वगैरे घेऊन ये. त्यावेळी माझ्याकडे अंबाबाईच्या अंगार्‍याची ही पुडी होती. हा अंगारा मी राहुलकडे दिला आणि त्याला सांगितलं की प्रमोदजींच्या उशीखाली ही पुडी ठेवावी, प्रमोद महाजन यांच्या उशीखाली ती पुडी ठेवल्यावर मी तिथे गेलो होतो, मी जपही केला होता. मात्र त्यावेळी प्रमोद महाजनांना मला हात लावता आला नाही. महाजन ज्या ठिकाणी अ‍ॅडमिट होते. त्या खोलीत कुणालाही जाण्याची परवानगी नव्हती. अशी परवानगी मिळाली असती तर मी महाजनांना वाचवू शकलो असतो, पण मी फेल झालो. असेही खैरे म्हणाले.

- Advertisement -

घाटी रुग्णालयातील रुग्णांना खैरेंनी बरे करून दाखवावे
जनतेचे लोकप्रतिनिधी असलेल्यांनी अशा स्वरुपाचा दावा करणे खूप चुकीचे आहे. महाराष्ट्र राज्यात जादुटोणा विरोधी कायदा आहे. त्यानुसार कुठल्याही दैवी चमत्काराचा दावा करुन लोकांची दिशाभूल करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलनचे हमीद दाभोळकर यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -