घरमहाराष्ट्रभीतीने मोदी, शाह, फडणवीस शिवसेनेत प्रवेश करतील, राऊतांचा इशारा

भीतीने मोदी, शाह, फडणवीस शिवसेनेत प्रवेश करतील, राऊतांचा इशारा

Subscribe

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरसुद्धा निशाणा साधला आहे. "अरे कोण एकनाथ शिंदे कोण चाळीस आम्हाला काय तुम्ही सांगताय? आम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य जवळून पाहिलेलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या आमचं सरकार आल्यावर भीतीने शिवसेनेत प्रवेश करतील असे संजय राऊत म्हणाले. राऊत यांनी ईडी आणि सीबीआयच्या कारवाईवरुन केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीसांना इशारा दिला आहे. सध्या महाराष्ट्रात ईडीचं सरकार असल्याची टीका विरोधकांकडून होत असते. तर ईडी सीबीआयच्या कारवाईवरुन संजय राऊतांनी ठाकरे गटाच्या राज्यव्यापी शिबीरातून शिंदे-फडणवीस आणि मोदी-शाह यांच्याव हल्लाबोल केला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशाराच दिला आहे. उद्या आमचे सरकार आल्यावर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेत प्रवेश करतील. पाकिस्तान या देशात तीन ए चालतात अल्ला, आर्मी आणि अमेरिका तसेच आपला देश तीन लोकं चालवतात ते म्हणजे ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग. मोदी वगैरे सगळं झूट आहे. उद्या आमच्या हातात सरकार आल्यावर २४ तासात मोदी, शाह, फडणवीस शिवसेनेत येतील. ईडीच्या भयाने फडणवीसांचा शिवसेना प्रवेश अशी बातमी सामनामध्ये वाचू पण घ्यायचे की नाही उद्धव ठाकरे ठरवतील अशा शब्दात फडणवीसांवर राऊतांनी हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

कोण एकनाथ शिंदे ?

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरसुद्धा निशाणा साधला आहे. “अरे कोण एकनाथ शिंदे कोण चाळीस आम्हाला काय तुम्ही सांगताय? आम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य जवळून पाहिलेलं आहे. तुम्ही काय आहात? तुमच्यात काय हिंमत आहे? तुमच्या मनगटात किती ताकद आहे? तुमच्या छातीमध्ये किती हवा आहे? किती ताकद आहे आम्हाला सगळं माहिती आहे.” तुम्ही आमच्या नादाला लागू नका असा इशारा राऊतांनी दिला आहे.

मोदींना तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

तामिळनाडूच्या ऊर्जा मंत्र्यांना अटक केली. त्यांना फरफटत घेऊन गेले. पण तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी एक उत्तर दिल आहे. ईडीला आणि मोदींना सांगितले आम्हाला त्रास द्याल तर याद राखा, आम्ही जर तुमच्यावरती हल्ला केला तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल. असा इशारा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

- Advertisement -

दोन मस्ताने चले लुटने औरं डुबाने

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदे फडणवीसांसह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर निशाणा साधला आहे. नाही महाराष्ट्रात लूट, मुंबईत लूट, देशात लूट त्या लुटीच्या कथा ऐकून मला दोन ओळी सुचल्या आहेत. दो मस्ताने चले झिंदगी बनाने, चुना लगाके पुरा देश डुबाने, दोन मस्ताने दिल्लीत आहेत तसेच महाराष्ट्रातसुद्धा आहेत. असे म्हणत राऊतांनी केंद्रासह राज्यातील शिंदे फडणवीसांवर निशाणा साधला आहे.


हेही वाचा : वाघाचे कातडे, लांडगे, मस्ताने म्हणत संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -