घरमहाराष्ट्रMPSC Exam : उमेदवारांकडे 'या' प्रकारचं मास्क अनिवार्य

MPSC Exam : उमेदवारांकडे ‘या’ प्रकारचं मास्क अनिवार्य

Subscribe

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा २१ मार्चला होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा होत आहे. त्यामुळे कोरोनासंबंधीत नियमावली जारी करण्यात आली आहे. परीक्षा देताना उमेदवाराने तीन पदरी मास्क वापरणं अनिवार्य आहे. याशिवाय, परीक्षा देताना कशाप्रकारे काळजी घ्यावी याचे नियम जारी केले आहेत. तसंच परीक्षा केंद्रात जाताना मास्क, हातमोजे, सॅनिटायजर असलेलं किट उमेदवारांना देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, उमेदवारांच्या तिव्र विरोधामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत परीक्षा एका आठवड्यात घेतली जाईल असं आश्वासन दिलं. त्यानंतर आदेश जारी होत २१ मार्चला परीक्षा होणार असल्याचं जाहीर केलं. MPSC च्या पूर्व परीक्षेसाठी राज्यात ८०० केंद्र आहेत. तब्बल २ लाख ८३ हजार उमेदवार ही परीक्षा देणार आहेत. दरम्यान, राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमावली जारी केली आहे.

- Advertisement -

आयोगाने परीक्षेच्या वेळी पालन करावयाच्या सूचना पुढीलप्रमाणे  

  • परीक्षा केंद्रात प्रवेश करताना उमेदवारांनी किमान तीन पदरी कापडी मास्क वापरणे अनिवार्य.
  • परीक्षा कक्षात मास्क, हातमोजे आणि सॅनिटायझरची लहान पिशवी असलेले किट प्रत्येक उमेदवाराला देण्यात येईल. त्याचा वापर दोन्ही सत्रांकरिता करायचा आहे.
  • परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्वच्छता आणि आरोग्यास हितावह वातारवण राखण्यासाठी हात सतत सॅनिटाईज करणे आवश्यक.
  • कोव्हिड-१९ सदृश्य लक्षणे (ताप, सर्दी, खोकला इ.) दिसून येत असल्यास संबंधित परीक्षआ उपकेंद्रावरील पर्यवेक्षकीय अधिकारी / कर्मचारी यांना आगाऊ कळवावे. अशा उमेदवारांना मास्क, हातमोजे, फेस शिल्ड, मेडिकल गाऊन, मेडिकल शु कव्हर, मेडिकल कॅप आदी गोष्टी असलेलं पीपीई किट उपलब्ध करून देण्यात येईल. त्यांची स्वतंत्र परीक्षा कक्षात बैठक व्यवस्था करण्यात येईल.
  • सोशल डिस्टन्सिंगसाठी परीक्षा उपकेंद्रावरील योग्य माहिती फलक, सांकेतिक चिन्हे, भित्तीपत्रिका आदी वरील सूचनांचे कटाक्षाने पालन करावे.
    परीक्षा संपल्यानंतर परीक्षा उपकेंद्राबाहेर जाताना शारीरिक अंतर राखणे अनिवार्य आहे.
  • वापरलेले टिश्यू पेपर, मास्क, हातमोजे, सॅनिटायझर पाऊच आदी वस्तू परीक्षा उपकेंद्रावरील आच्छादित कुंडीत टाकावेत.
  • कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -