घरताज्या घडामोडीMPSC परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित, तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांची गैरसोय

MPSC परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित, तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांची गैरसोय

Subscribe

उमेदवारांनीही वारंवार तक्रारी केल्यानंतर आयोगाने अर्ज करण्याची प्रक्रिया स्थगित केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग तांत्रिक अडचणी दूर करुन पुन्हा विद्यार्थ्यांना अर्ज करण्याबाबत माहिती देणार आहे.

राज्यात कोरोना काळात आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रा लोकसेवा आयोगाकडून अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक परीक्षा लांबणीवर गेल्या यामुळे उमेदवारांना नाहक त्रासही सहन करावा लागला आहे. काही उमेदवारांनी आक्रमक पवित्रासुद्धा घेतला होता. आता तर एमपीएससीची अर्ज भरण्याची प्रक्रियाच स्थगित करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली आहे. यामुळे अनेक उमदेवरांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तर अनेकांची गैरसोय झाली आहे. एमपीएससीची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवते. स्पर्धा परीक्षांचे आयोजन करत असते. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेला उमेदवार सरकारी अधिकारी म्हणून काम करत असतो. परंतु गेल्या २ वर्षांपासून एमपीएससीच्या अनेक पदांवर भरती प्रक्रिया रखडल्या आहेत. आता अर्ज करण्यावरही स्थगिती आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राल लोकसेवा आयोगाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन उमेदवारांना माहिती दिली आहे. मध्ये एमपीएससीने असे म्हटलं आहे की, प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल तसेच सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल, अशी माहिती एमपीएससीकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

एमपीएससी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमधील तांत्रिक अडचण दूर करत नाही तोपर्यंत कोणत्याही उमेदवाराला अर्ज करता येणार नाही. यामुळे उमेदवारांची मात्र गैरसोय होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची पक्रिया सुरु करण्यात आली तेव्हापासूनच आयोगाला तांत्रिक अडचणी येत होत्या. उमेदवारांनीही वारंवार तक्रारी केल्यानंतर आयोगाने अर्ज करण्याची प्रक्रिया स्थगित केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग तांत्रिक अडचणी दूर करुन पुन्हा विद्यार्थ्यांना अर्ज करण्याबाबत माहिती देणार आहे.


हेही वाचा : corona Vius : दुबईसह UAE देशांतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईनमध्ये सूट, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -