घरमहाराष्ट्रMPSC Exam: कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलली, मुख्यमंत्र्यांची घोषणा

MPSC Exam: कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलली, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Subscribe

येत्या ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेबाबत निर्णय घेण्यासाठी आज मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीत रविवारी होणारी एमपीएसची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

राज्यभरात एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या काही विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. तसेच विकेंड लॉकडाऊनमुळे परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी जाणवत होत्या. त्य़ामुळे अनेक एमपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांनी येत्या रविवारी होणार परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मुख्य़मंत्र्य़ांकडे केली होती. या मागणी दखल घेत मुख्यमंत्र्य़ांनी रविवारी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा पुढे ढकलली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील एमपीएससी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

दरम्यान एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली होती. दरम्यान मंत्रिमंडळातील नेते जितेंद्र आव्हाड, रोहित पवारांसह काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी योग्य नियोजन करत परीक्षा घ्याव्यात आणि आत्ता घोषित केलेल्या परीक्षांच्या तारखेबाबत पूनर्विचार करावा अशी मागणी केली होती. त्यामुळे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली आहे.

- Advertisement -

या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी एमपीएसी समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना आणि प्रातिनिधीक स्वरुपात सोलापूर, अहमदनगर,सातारा, हिंगोली यवतमाळ, मुंबई, पुणे, लातूर, नागपूर, कोल्हापूर यासह राज्यभरातील विविध शहरातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनसह सर्व नेत्यांनी याला योग्य प्रतिसाद देत परीक्षा रद्द केली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -