घरक्रीडाIPL 2021 : हेझलवूडच्या जागी चेन्नईने घेतले 'या' ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला संघात! 

IPL 2021 : हेझलवूडच्या जागी चेन्नईने घेतले ‘या’ ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला संघात! 

Subscribe

हा गोलंदाज याआधी मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाला आजपासून सुरुवात होणार आहे. मात्र, ही स्पर्धा सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाला धक्का बसला होता. त्यांचा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जॉश हेझलवूडने यंदाच्या मोसमातून माघार घेतली होती. परंतु, आता त्याची जागा घेण्यासाठी चेन्नईने ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज जेसन बेहरनडॉर्फची संघात निवड केली आहे. बेहरनडॉर्फ याआधी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. त्याने २०१९ मध्ये आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले होते. त्याला आतापर्यंत पाच आयपीएल सामन्यांत पाच विकेट घेण्यात यश आले आहे. तसेच त्याने ऑस्ट्रेलियाचे ११ एकदिवसीय आणि सात टी-२० सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे.

पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध

महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाला आयपीएलच्या मागील मोसमात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले होते. यंदा मात्र चेन्नईच्या कामगिरी सुधारणा अपेक्षित आहे. आता बेहरनडॉर्फच्या समावेशाने चेन्नईची गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. चेन्नईकडे बेहरनडॉर्फसह ड्वेन ब्राव्हो, सॅम करन आणि लुंगी इंगिडी या परदेशी वेगवान गोलंदाजांचा पर्याय आहे. यंदा चेन्नईचा पहिला सामना १० एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होईल.

- Advertisement -

हेझलवूडची स्पर्धेतून माघार

३० वर्षीय हेझलवूडने काही दिवसांपूर्वी आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती. यावर्षी अ‍ॅशेस आणि टी-२० वर्ल्डकप होणार आहे. या स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी पूर्णपणे फिट राहता यावे म्हणून हेझलवूडने आगामी आयपीएल मोसमात न खेळण्याचा निर्णय घेतला. हेझलवूडने आयपीएलच्या मागील मोसमात केवळ तीन सामने खेळले होते.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -