घरमहाराष्ट्रमुंबईकरांसाठी खूशखबर! एसी लोकलचे तिकीट ५० टक्क्यांनी स्वस्त

मुंबईकरांसाठी खूशखबर! एसी लोकलचे तिकीट ५० टक्क्यांनी स्वस्त

Subscribe

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची मोठी घोषणा

इच्छा असूनही केवळ महागड्या तिकीट दरांमुळे वातानुकूलित (एसी) लोकलमधून प्रवास करण्याचे टाळणार्‍या मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. मुंबई उपनगरीय एसी लोकलचे तिकीट दर थेट ५० टक्क्यांनी कमी करण्याची मोठी घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी केली. एसी लोकलचे दर निम्म्याने कमी झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. दर कमी केले असले तरी त्याची अंमलबजावणी कधीपासून केली जाणार हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

रावसाहेब दानवे यांनी मुंबईत एका कार्यक्रमानिमित्त भायखळा रेल्वे स्थानकाला भेट दिली. या कार्यक्रमात एसी लोकलचे तिकीट दर ५० टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा त्यांनी केली. नवीन दरानुसार २५ किलोमीटरच्या प्रवासासाठी ६५ रुपये आकारले जाणार आहेत. याआधी हा दर १३५ रुपये होता, तर ५० किलोमीटर अंतरासाठी आधी २०५ रुपये तिकीट दर होता. हा दर आता १०० रुपये असणार आहे.

- Advertisement -

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वतीने काही एसी लोकलदेखील चालवण्यात येतात, मात्र दर अव्वाच्या सव्वा असल्याने प्रवाशांनी एसी लोकलकडे पाठ फिरवली आहे. हे दर कमी करण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे प्रवासी संख्या वाढण्यासाठी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या मुंबईतील तापमान ४० अंशांच्या जवळ पोहचले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात एसी लोकलचे दर ५० टक्के कमी झाल्याने मुंबईकरांचा लोकल प्रवास सुखकारक होणार आहे.

किलोमीटर – सध्याचे दर- सुधारित दर
५ -६५ -३०
२५- १३५- ६५
५० -२०५ -१००
१०० -२९० -१४५
१३०- ३७०- १८५

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -