घरमहाराष्ट्रअखेर एमपी मिल प्रकरण मेहतांना भोवले; मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपदच घेतले काढून!

अखेर एमपी मिल प्रकरण मेहतांना भोवले; मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपदच घेतले काढून!

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती तो मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला असून, या मंत्रिमंडळ विस्तारात १३ जणांचा समावेश झाला आहे. मात्र, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना एमपी मिल कम्पाउंड प्रकरण चांगलेच भोवले असून, त्यांची थेट मंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती तो मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला असून, या मंत्रिमंडळ विस्तारात १३ जणांचा समावेश झाला आहे. यामध्ये आठ कॅबिनटे तर पाच राज्यमंत्री निवडण्यात आले आहेत. मात्र गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना मात्र एमपी मिल कम्पाऊंड प्रकरण चांगलेच भोवले असून, त्यांची थेट मंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

म्हणून प्रकाश मेहतांना गमवावे लागले मंत्रीपद

आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असून, ऐन निवडणुकीच्या तोंडावर एम.पी.मिल कम्पाऊंड प्रकरणामुळे विरोधक भाजपा विरोधात रान उठवतील. तसेच निवडणुकीपूर्वी महत्त्वपूर्ण अशा पावसाळी अधिवेशनात देखील विरोधक प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी करतील. त्यामुळे येत्या निवडणुका लक्षात घेता प्रकाश मेहता यांना मंत्रिपदावरून हटवले गेल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, एमपी मिल कम्पाऊंड प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर लोकायुक्तांनी प्रकाश मेहता यांच्यावर ठपका ठेवला होता. तसेच लोकायुक्तांनी दिलेला अहवाल राज्य सरकारला मिळाल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी हा अहवाल विधानसभेत मांडला जाईल, असे देखील सांगितले होते.

- Advertisement -

या मंत्र्यांना मिळाला डच्चू

आजच्या मंत्रीमंडळ विस्तारात १३ नव्या चेहऱ्यांना जरी संधी मिळाली असली, तरी प्रकाश मेहता, विष्णू सावरा, राजकुमार बडोले, राजे अत्राम, दिलीप कांबळे आणि प्रविण पोटे यांना मात्र, मंत्रिपदावरून पाय उतार व्हावे लागले. दरम्यान, या सर्व नेत्यांनी मंत्रिपदाचे राजीनामे मुख्यमंत्र्यांना सादर केले असून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे राजीनामे स्विकारले आहेत.


हेही वाचा – ठग्स ऑफ महाराष्ट्र म्हणणाऱ्या विखेंना मिळाले मंत्रिपद

- Advertisement -

हेही वाचा – मंत्रीमंडळातून ‘या’ सहा जणांना डच्चू; मुख्यमंत्र्यांनी स्विकारले राजीनामे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -