घरताज्या घडामोडीMumbai Corona Update : मुंबईतील रुग्णांच्या मृत्यूचा आकडा शून्यावर, २४ तासांत २७...

Mumbai Corona Update : मुंबईतील रुग्णांच्या मृत्यूचा आकडा शून्यावर, २४ तासांत २७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Subscribe

मुंबईतील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. रूग्णांच्या मृत्यूचा आकडा आजही शून्यावर कायम आहे. मागील २४ तासांत मुंबईत २७ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २४ तासांत २७ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे एकूण बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या १०३७३८० इतकी आहे. तसेच बरे झालेल्या रूग्णांचा दर ९८ टक्के इतका आहे.

- Advertisement -

मुंबईत कमी आढळणाऱ्या रूग्णांमुळे कोरोना दुपटीचा दर १३ हजार ६०१ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईतील सक्रिय रूग्णसंक्या कमी झाली असून ही आज ३३४ इतकी झाली आहे. नव्याने सापडलेल्या २७ रूग्णांपैकी ५ रूग्णांनाच रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालिकेकडील २८ हजार ५१३ बेड्सपैकी केवळ १४२ बेड वापरात आहेत.

७ मार्च २०२१ ते १३ मार्च २०२२ पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.००५ टक्के इतका आहे. तर ऑक्सिजन बेड ७ हजार ३६५ इतके आहेत. मुंबईसह इतर राज्यात रूग्ण कमी आढळत असल्याने देशातही कोरोना विषाणूचा संसर्ग मंदावला आहे.

- Advertisement -

राज्यातील रूग्णांची आकडेवारी काय?

राज्यात गेल्या २४ तासांत १५७ इतक्या नवीन कोरोना बाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज १ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२१,२२० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०९% एवढे झाले आहे.


हेही वाचा : सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी केलेल्या आरोपावर अजित पवारांनी मांडली भूमिका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -