घरमहाराष्ट्रइफ्तार पार्टीला संजय पांडेंची हजेरी, रझा अकादमीला प्रोत्साहित करण्याचा आयुक्तांवर दबाव? -...

इफ्तार पार्टीला संजय पांडेंची हजेरी, रझा अकादमीला प्रोत्साहित करण्याचा आयुक्तांवर दबाव? – नितेश राणे

Subscribe

रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीला मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी हजेरी लावली. यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी टीकेची झोड उठवली आहे. रझा अकादमीला प्रोत्साहित करण्यासाठी आयुक्तांवर दबाव आहे का? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. तसंच, त्यांनी रझा अकादमीला प्रोत्साहित करणं हे महाविकास आघाडीचं धोरण आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.

नितेश राणे यांनी संजय पांडे यांचा रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीचा फोटो ट्विटरवर शेअर करत मविआवर टीका केली आहे. “ज्या ‘रझा अकादमीने’ आझाद मैदानात अमर जवान मुर्ती तोडली आणि महिला पोलिस भगिनींशी गैरवर्तन केले अशा देशविरोधी कृती करणाऱ्यांच्या इफ्तारमध्ये सामिल होऊन त्यांना अधिकृतरित्या प्रोत्साहित करणे हे महाविकास आघाडीचं धोरण राबविण्याचा अधिकाऱ्यांवरती दबाव आहे का?” असं नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

नितेश राणे यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी, “काल मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीला उपस्थित होते. ही रझा अकादमी कोण आहे, या रझा अकादमीने आझाद मैदानावरच्या अमर जवान स्तंभाची मोडतोड केली. त्यानंतर महिला पोलिसांवर मारपीट आणि अत्याचार केले. सतत देशाविरोधी, भारताविरोधी भूमिका घेतली आहे. हीच रझा अकादमी आहे, ज्यांनी भिवंडी मोर्चाच्या नंतर दोन पोलीस अधिकाऱ्यांना मारलं. नुकतंच नांदेड, अमरावती आणि मालेगावमध्ये दंगल भडकवण्यामागे पुढाकार घेतला. त्या मोर्चांमध्येपण मोठ्या प्रमाणावर अत्याचार केला. एका बाजूला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मला सभागृहामध्ये सांगतात की रझा अकादमीवर बंदी घालण्याचा विचार करतोय आणि दुसऱ्या बाजूला यांचे पोलीस अधिकारी त्यांच्याबोरबर इफ्तार पार्टी करत असतील तर महाविकास आघाडीचा अधिकाऱ्यांना दिलेला सरकारी आदेश तर नाही ना?असा प्रश्न मला विचारायचा आहे,” असं नितेश राणे म्हणाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -