घर नवी मुंबई Mumbai-Goa Highway : राज ठाकरेंचे भाषण संपताच कार्यकर्ते लागले कामाला; महामार्गावर आंदोलन...

Mumbai-Goa Highway : राज ठाकरेंचे भाषण संपताच कार्यकर्ते लागले कामाला; महामार्गावर आंदोलन सुरू

Subscribe

मागील काही दिवसांपासून मनसेचे नेते राज ठाकरे हे मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून आणि झालेल्या दुरावस्थेवरून सरकारवर टीका करीत आहेत.

मुंबई : आपल्या प्रत्येक जाहीर सभेत मंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा विषय लावून धरणारे आणि त्यावरुन सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण सोडणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी आज पनवेल येथे झालेल्या निर्धार मेळाव्यात पुन्हा एकदा या महामार्गाचा विषय काढत या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आंदोलन करण्याचे आदेश मनसेसैनिकांना दिले होते. राज ठाकरेंचे भाषण संपताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी पेणजवळ महामार्गावर आंदोलन सुरू केले आहे.(Mumbai-Goa Highway As soon as Raj Thackeray’s speech was over, activists started working Protest started on the highway)

मागील काही दिवसांपासून मनसेचे नेते राज ठाकरे हे मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून आणि झालेल्या दुरावस्थेवरून सरकारवर टीका करीत आहेत. दरम्यान त्यांनी आज पनवेलमध्ये घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा उल्लेख करीत मनसे कार्यकर्त्यांना आंदोलनाचे आदेश दिले. आतापर्यंतचा अनूभव पाहता मनसेच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ आदेशाला ओ देत पेणजवळ महामार्गावर आंदोलन सुरू केले आहे.

मनसेचे आंदोलन आणि वाहतुकीचा खोळंबा

- Advertisement -

मनसेचे स्थानिक नेते जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात पेणजवळील मुंबई-गोवा महामार्गावर आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी महामार्गावरील खड्ड्यात वृक्षारोपण केले. तर सरकारविरोधात घोषणाबाजी केली. मात्र, यावेळी या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती.

हेही वाचा : मुंबईतील कामा, जीटी, सायन, नायर, कूपर, केईएम रुग्णालयंच आजारी; ‘या’ सुविधांचा अभाव

काय म्हणाले होते राज ठाकरे?

- Advertisement -

पनवेल येथील कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत आणि झालेल्या दुरावस्थेबाबत पुन्हा एकदा सरकारवर टीकेचे बाण सोडले. यावेळी ते म्हणाले की, पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत मुंबई-गोवा महामार्ग व्हावा यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी अलर्ट राहले पाहीजे. या रस्त्याच्या कामासाठी आंदोलन करण्याची वेळ आली प्रसंगी आंदोलनही करा, मात्र, आंदोलन करताना ते असे करा की सरकारला आपल्या आंदोलनाची आठवण आणि दहशत राहली पाहीजे असेही राज ठाकरे यांनी म्हणाले होते.

हेही वाचा : पवार मोठेच नेते, त्यांना कुणीही ऑफर देऊ शकतो; शरद पवारांबाबत कुणी म्हटले असे? वाचा-

जमिनी आणि उद्योगावरही केले भाष्य

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मुंबई गोवा रस्ता झाल्यावर पण कोकणी माणसांच्या जमिनी कुणीही बळकावू नये हे बघण्याचे आदेशही कार्यकर्त्यांना देत पुढे ते म्हणाले की, कोकणात उद्योग आलेच पाहिजेत पण ते कोकणाच्या निसर्गाची हानी होणार नाही याचीही काळजी घेणे गरजेचे असल्याचे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले.

- Advertisment -