घरताज्या घडामोडीनवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे शक्तिप्रदर्शन, फडणवीसांसह बड्या नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे शक्तिप्रदर्शन, फडणवीसांसह बड्या नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Subscribe

दाऊद कनेक्शनमध्ये अटक करण्यात आलेले राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे सरकार नवाब मलिकांना पाठीशा घालत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भाजपच्या नेत्यांनी मुंबईत आझाद मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंत भव्य मोर्चा काढला होता. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने भाजप कार्यकरर्ते सहभागी झाले होते. पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांच्यासह बड्या नेत्यांना ताब्यात घेतलं आहे. भाजप नेत्यांना पोलिसांनी यलो गेट पोलीस स्थानकात नेले आहे.

आझाद मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंतचे अंतर कमी असल्यामुळे मोर्चा काही वेळातच पोहोचला होता. मोर्चा मेट्रो सिनेमापर्यंत पोहचल्यानंतर पोलिसांनी भाजपच्या बड्या नेत्यांना ताब्यात घेतलं आहे. एका गाडीत पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं तर दुसऱ्या गाडीमध्ये देवेंद्र फडणवीस, नितेश राणे, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांना ताब्यात घेतलं आहे.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी आवाहन केल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय तसेच त्यांनी घोषणासुद्धा दिल्या आहेत. फडणवीसांना ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी मेट्रो सिनेमापाशी ठिय्या मांडला आहे. पोलिसांनी या भागात मोठ्या प्रमाणात बॅरिगेट लावले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरु आहे. पोलिसांना कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन मोर्चापूर्वी फडणवीस यांनी केले आहे.

- Advertisement -

हे राजकीय आंदोलन नाही आहे. मुंबईच्या खुन्यांशी ज्यांनी सौदा केला आणि त्यांना फायदा पोहोचवून दिला. अशा लोकांवर झालेली कारवाई आहे. अशा लोकांनी ज्यांनी मदत केली आहे. देशाच्या शत्रूसोबत कोणी सौदा करत असेल तर आम्ही कोणतीही किंमत मोजायला तयार आहोत. पण यांना मंत्रिमंडळात राहू देणार नाही असे फडणवीस पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर म्हणाले आहेत.

यलो गेट पोलीस स्टेशनमधून फडणवीसांना सोडलं 

मोर्चानंतर ताब्यात घेतल्यानंतर फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांना यलो गेट पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले होते. यानंतर त्यांना तक्रार केल्यानंतर सोडण्यात आले आहे. पोलिसांनी पाऊणतास फिरवल्यानंतर पोलीस ठाण्यात घेऊन गेले असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.


हेही वाचा : ED जवळ नवाब मलिकांवरोधात पुरावे, त्यांचा राजीनामा घ्या, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -