घरमहाराष्ट्रED जवळ नवाब मलिकांवरोधात पुरावे, त्यांचा राजीनामा घ्या, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

ED जवळ नवाब मलिकांवरोधात पुरावे, त्यांचा राजीनामा घ्या, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

Subscribe

जो आजही जेलमध्ये आहे. दुहेरी जन्मठेप झाली आहे, त्या ठिकाणी त्याचा गुन्हा सिद्ध झालाय. असा हा सरदार शाहवली खान बॉम्बस्फोटाच्या आरोपात जेलमध्ये असताना दुसरा सलीम पटेल आहे, हसिना पारकर त्या दाऊद इब्राहिमची बहीण आहे, जिच्या नावानं दाऊद इब्राहिम महाराष्ट्रात रिअल इस्टेटचा धंदा चालवतो, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय.

मुंबईः नवाब मलिक यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसू शकत नाही. या ठिकाणी रोज घटना घडतात, फक्त राजीनाम्यासाठी आम्ही बोलत नाही. पण रोज काही आम्ही राजीनामे मागत नाही. राज्याकरिता ही लाजिरवाणी घटना आहे, असंही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणालेत. भाजपचे प्रमुख नेते आझाद मैदानावर दाखल झाले असून, त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. मोर्च्याचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत आहेत. राणीची बाग ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलाय.

त्या ठिकाणी बॉम्बस्फोटाचा आरोपी सरदार शहावली खानवर आरोप काय, याकूब मेमनसोबत बसून बॉम्बस्फोटाचा कट केला. केवळ कट केला नाही, बॉम्ब कसा बनवायचा याचं प्रशिक्षण घेतलं. केवळ प्रशिक्षण घेतलं नाही, तो बॉम्ब स्कूटरमध्ये ठेवला. त्या ठिकाणी त्या स्कूटर नेऊन ठेवून हे बॉम्बस्फोट घडवण्याचं काम या सरदार शहावली खानने केलं. जो आजही जेलमध्ये आहे. दुहेरी जन्मठेप झाली आहे, त्या ठिकाणी त्याचा गुन्हा सिद्ध झालाय. असा हा सरदार शाहवली खान बॉम्बस्फोटाच्या आरोपात जेलमध्ये असताना दुसरा सलीम पटेल आहे, हसिना पारकर त्या दाऊद इब्राहिमची बहीण आहे, जिच्या नावानं दाऊद इब्राहिम महाराष्ट्रात रिअल इस्टेटचा धंदा चालवतो, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय.

- Advertisement -

धंदा चालवून याच ठिकाणी पैसा जमा करून त्याच पैशाच्या माध्यमातून आणि आयएसआयच्या मदतीनं या मुंबईत बॉम्बस्फोट घडवत होता. त्या हसीना पारकरचा फ्रंट मॅन हा सलीम पटेल या दोघांनी मिळून हे षडयंत्र रचलं. एक पुनिरा बाई तिची जमीन कब्जामध्ये घेतली. एलबीएस रोडवरची तीन एकराची जमीन, जमिनीचा भाव कोट्यवधी रुपये, त्या वेळेचा सरकारी भावदेखील दोन हजार रुपये चौरस फूट आणि यांनी खोटी पॉवर ऑफ अटर्नी तयार केली. ही जमीन सॉलिडस इन्फ्रास्ट्रक्चरला विकली. सॉलिडस इन्फ्रास्ट्रक्चर कोणाचा आहे. नवाब मलिक यांचं सॉलिडस इन्फ्रास्ट्रक्चर, त्याने कोणाकडून जमीन घेतली. जो व्यक्ती मुंबईत बॉम्बस्फोट करून हजारो लोकांना मारून जेलमध्ये आहे. अशा जेलमधल्या व्यक्तीकडून या ठिकाणी तुम्ही जमीन विकत घेता. या ठिकाणी 25 रुपये चौरस फुटानं तीन एकर जागा एलबीएस रोडवर यांनाकडून नवाब मलिकांनी विकत घेतली, असंही त्यांनी सांगितलं.

मुंबईत एखादा शौचास बसला तरी त्या जागेची किंमत ही 25 स्क्वेअर फूटपेक्षा जास्त आहे. विक्री पत्रावर पहिला फोटो सरदार शहावली खानचा आहे. दुसरा फोटो दाऊदच्या सलीम पटेलचा आहे. तिसरा फोटो नवाब मलिकाच्या मुलाचा आहे. तिघंही त्याच्यावर सह्या करत आहेत. शहावली खान आणि सलीम पटेलकडून खोट्या प्रकारचे कागदपत्र तयार करून हा सगळा खोटेपणा केला. एवढ्यावरच ही कहाणी थांबत नाही, ज्यावेळी ईडीनं याचं इन्व्हेस्टिगेशन केलं. या कटाच्या मागची सूत्रधार दाऊदची बहीण हसिना पारकर होती. तो सर्व पैसा हसिना पारकरला नेऊन दिला. हा सर्व पैसा हसिना पारकरने कशाकरिता वापरला. मुंबईत तीन बॉम्बस्फोट झालेत. अशाच पैशातून हे बॉम्बस्फोट झालेत. अशाच पैशातून मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून टेरर फंडिंग केलं गेलं. टेरर फंडिंगमध्ये मदत करणारा महाराष्ट्राच एक मंत्री होता, असंही देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलं.

- Advertisement -

हेही वाचाः BJP Protest: इंद्राचे आसन वाचू शकले नाही, तर मुख्यमंत्री तुमचे आसन काय वाचणार? – आशिष शेलार

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -