घरमहाराष्ट्रथुंकण्यासाठी तोंड बाहेर काढले आणि...

थुंकण्यासाठी तोंड बाहेर काढले आणि…

Subscribe

पुणे विभागातील बातम्या वाचा थोडक्यात ....

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एक विचित्र अपघात झाला आहे. रसायनी पोलीस ठाणे हद्दीच्या जवळ चालत्या बसमधून एक प्रवासी पडल्याने हा अपघात झाला. २२ वर्षीय प्रकाश सिंग हा खासगी बसमधून प्रवास करत होता, त्यावेळी बसमधून पडून तो जखमी झाला आहे. त्याने प्रवासात गुटखा खाल्ला होता, तो थुंकण्यासाठी त्याने चालत्या बसचा दरवाजा उघडला आणि थुंकण्याचा प्रयत्न केला. बसचा वेग जास्त असल्याने तोल जाऊन तो चालत्या बसमधून खाली पडला आणि महामार्गावर कोसळला.सुदैवाने मागून कोणतेही वाहन नसल्याने तो या अपघातातून थोडक्याच बचावला. त्याला रुग्णालयात नेण्यासाठी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने त्याच्यावर वेळीच इलाज करण्यात आले. त्याला पनवेल येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.


12 सप्टेंबर रोजी ‘नो हॉर्न डे’

पुणे  । ध्वनी प्रदूषणात भर घालणार्‍या वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. या उद्देशाने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे शहर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन आणि जिल्हा रस्ता सुरक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहर आणि जिल्ह्यात 12 सप्टेंबर हा दिवस ‘नो हॉर्न डे’ म्हणून पाळला जाणार आहे. अशी माहिती पुणे शहर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे यांनी दिली आहे.पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्या नेतृत्वाखाली आणि उपप्रादेशिक अधिकारी संजय राऊत व विनोद सगरे यांच्या संकल्पनेतून पुणे शहर आणि जिल्ह्यात ‘नो हॉर्न डे’ पाळला जाणार आहे. या मोहिमेत पुणे प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी, पुणे शहर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे पदाधिकारी यशवंत कुंभार, निलेश गांगुर्डे, निखिल बोराडे, विविध ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक तसेच सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत.

- Advertisement -

गणेश उत्सवाची वर्गणी देण्यास नकार दिल्याने मारहाण

पुणे । गणेश उत्सवाची वर्गणी देण्यास नकार दिल्याने तिघांनी मिळून दोन तरुणांना मारहाण केली. हा प्रकार एका वडापावच्या गाड्यासमोर सुरु होता. गाड्यासमोर भांडण सुरु असल्याने गाडा मालक तरुण भांडण सोडविण्यासाठी गेला. त्यावेळी तिघांनी मिळून भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणालाच बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. हा प्रकार रामनगर चिंचवड मधील राम मंदिरासमोर घडला.मयूर विटेकर (19) या तरुणाने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वैभव माने (22), रमजान शेख (19) आणि अन्य एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -